Deola | स्व. कु. आरोही आहेर व स्व. चि. सार्थक शिवदे यांच्या स्मरणार्थ नांदुरी आश्रम शाळेत अन्नदान

0
15
#image_title

सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | येथील शिवराजे मित्र मंडळ, कळवण रोड च्यावतीने मंडळाचे सदस्य योगेश आहेर यांची कन्या स्व. आरोही व सागर शिवदे यांचा चि. स्व. सार्थक शिवदे यांच्या स्मरणार्थ नांदुरी येथील सप्तशृंगी आनंद आश्रमात अन्नदान करण्यात आले.

Deola | खर्डे ग्रामपंचायतीच्या वतीने डासांचा प्रादुर्भाव लक्षात घेत गावात यंत्राद्वारे धुरळणी करण्यात आली

समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही उदात्त भावना डोळ्यासमोर ठेवून देवळा येथील शिवराजे मित्र मंडळ हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. गणेशोत्सव काळात विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच साहित्यिक उपक्रम राबविले जातात. या वर्षीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने स्व. आरोही योगेश आहेर व स्व. सार्थक सागर शिवदे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करत नांदुरी येथील सप्तशृंगी आनंद आश्रमास भेट देऊन अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Deola | उमराणेत बुधवारी आ. कडू यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा; राजकीय दृष्ट्या विशेष महत्व

 यांनी दर्शवली उपस्थिती

यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किरण आहेर, अध्यक्ष ललित आहेर, उपाध्यक्ष भुषण आहेर, सरचिटणीस हंसराज देवरे, खजिनदार गौरव आढाव, कार्याध्यक्ष सुरज आढाव, जेष्ठ सदस्य अमोल भदाणे, मुन्ना आढाव, ॲड. रितेश निकम, भरत शिंदे, विशाल मौर्य, रविंद्र आहेर, सागर धात्रक, रोहन निकम, किरण आढाव, हितेश पगार, योगेश आहेर, भुषण आहेर, रवि आहिरे आदि सदस्य उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here