सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | प्रहार संघटनेच्या वतीने उमराणे (ता. देवळा) येथे बुधवारी (दि. १८) सायंकाळी ६ वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार बच्चू कडू यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी दिली. मेळाव्यात शेतकरी, दिव्यांग, कष्टकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेची भूमिकादेखील मांडली जाण्याची शक्यता आहे. याप्रसंगी चांदवड, देवळा तालुक्यांतील शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Deola | जाणीव पतसंस्थेच्या वतीने सभासदांना ९ % लाभांश; चेअरमन भाऊसाहेब पगार
शेतकरी मेळाव्याची जय्यत तयारी सुरू
दरम्यान, या शेतकरी मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात येत असून, यासाठी प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तालुक्यातील गावागावात जाऊन शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेत मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करीत आहेत. बॅनर बाजी तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. या शेतकरी मेळाव्यातून आमदार बच्चू कडू होऊ घातलेल्या चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा करून निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे समजते. यामुळे बुधवारी उमराने येथे आ. कडू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शेतकरी मेळाव्याकडे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांचे लक्ष लागून राहिले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम