Deola | “खर्डेकर मतदान कर” असा नारा देत आरोग्य विभागाने खर्डे गावात राबवले मतदान जनजागृती अभियान

0
12
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | होऊ घातलेल्या चांदवड-देवळा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “खर्डेकर मतदान कर” या टॅगलाईन खाली खर्डे ग्रामपंचायत, आरोग्य विभागाच्या वतीने खर्डे गावांत मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून, मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर मतदान जनजागृती केली जात आहे. या पार्श्वभूमीवर खर्डे ता देवळा येथे शनिवारी दि. ९ रोजी ग्रामपंचायत, आरोग्य विभागाच्या वतीने गावांत जनजागृती अभियान राबविण्यात आले. संपूर्ण गावातून प्रभात फेरीच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात आले.

Deola | गृहभेट मतदान प्रक्रियेअंतर्गत देवळा शहरात २५ पैकी २३ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

या मंडळींनी दर्शविली उपस्थिती

यावेळी ग्रामविकास अधिकारी योगेश पगार, पोलीस पाटील भारत जगताप, आरोग्य सेवक पाटील, आरोग्य सेविका श्रीमती निकम, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती अलका जाधव, श्रीमती गवारे, श्रीमती सूर्यवंशी, श्रीमती गांगुर्डे, श्रीमती अरुणा थोरात, श्रीमती अहिरे, श्रीमती भामरे, आशा सेविका सविता देवरे, श्रीमती मनीषा अहिरे, श्रीमती वनिता खैरनार, श्रीमती ताराबाई निर्भवणे, ग्रामपंचायत कर्मचारी राहुल मोरे, राहुल बागुल, अशोक सोळसे, शशिकांत जाधव, दिनेश पवार आदी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here