सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | खामखेडा येथील जनता विद्यालयाच्या दहावी बॅचचे माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी तब्बल १६ वर्षांनी एकत्र आले. त्या वेळी शिकवत असलेल्या गुरुजनांशी व आपल्या वर्ग मित्रांशी त्यांनी संवाद साधला. सोळा वर्ष्यानंतर एकत्र आल्यावर आठवणींचा उमाळा दाटलेला प्रत्यकाने अनुभवला.
Deola | देवळ्यातील मार्केट यार्ड परीसरात आढळला अनोळखी मृतदेह
विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्सहात सम्पन्न
सन २००८ ला इयत्ता दहावीची परीक्षा देऊन विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या बालमित्रांची भेट होत नव्हती. ठराविक मित्र सोशियल माध्यमातून संवाद साधत होती. मनोहर मोरे यांना सोशियल संवादातून स्नेह मेळाव्याची कल्पना सुचली व त्यांनी एक दोन शालेय मित्रांना याची कल्पना दिली. वर्ग मित्रांच्या संवादातून मेळाव्याची तारीख ठरली. अन नुकताच ह्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्सहात सम्पन्न झाला.
Deola | देवळा शहरात धाडसी घरफोडी; पाच लाखांहून अधिक सोने लंपास
शालेय आठवणींना दिला उजाळा
अध्यक्ष्स्थानी सटाणा जिजामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भामरे या होत्या. बी. वाय. सोनवणे मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दहावीच्या बॅचचे सर्व विध्यार्थी उपस्थित रहात पुन्हा १६ वर्षांनी शाळा भरली. मनोहर मोरे, अमोल शेवाळे, गोरख वाघ, उमेश बोरसे यांनी स्नेहमेळाव्याचे आयोजन करून सोळा वर्षांनी सर्वांना एकत्र केले. पुन्हा शालेय आठवणीला उजाळा दिला.
या माजी विद्यार्थ्यांनी लावली हजेरी
उपस्थित शिक्षकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी मनोहर मोरे, गोरख वाघ, अमोल शेवाळे, सागर बोरसे, कैलास शेवाळे, विद्याधर शेवाळे, स्वप्निल शेवाळे, सागर भालेराव, कैलास शेवाळे, किसन पवार, उमेश बोरसे, समाधान सोनवणे, गोरख मोरे, दीपक सोजवळ, सुरज बिरारी, भालचंद्र देवरे, देविदास बोरसे, अमित अहिरे, निलेश सोनवणे, शितल मोरे, राणी बोरसे, धनश्री वाघ, वैशाली शेवाळे, प्रतिभा बोरसे, प्रियंका भामरे, गितल बोरसे, उज्वला शेवाळे, केदाबाई शेवाळे, शालिनी मोरे सुवर्णा पवार, सोनाली सूर्यवंशी आदी विद्यार्थी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम