सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | सरस्वतीवाडी ता.देवळा येथून सोमवारी दि. ७ रोजी कांद्याने भरलेले चोरीस गेलेले ट्रॅक्टर रविवारी दि. १३ रोजी दिंडोरी तालुक्यात मिळाल्याने ट्रॅक्टर मालक विजय आहेर यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
Deola | मेशी येथे दिड वर्षांच्या चिमुकलीचा घरासमोरील पाण्याच्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
अज्ञात चोरट्यांनी सोमवारी केले होते ट्रॅक्टर लंपास
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सरस्वतीवाडी येथील शेतकरी विजय झिषु आहेर यांचे मालकीचे महींद्रा कंपनीचे लाल रंगाचे सरपंच कंपनीचे ट्रॅक्टर क्र.( MH-41-D-383 ) हे कांदा भरुन चाळीत उभे केलेले असताना सोमवारी दि. ७ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. मंगळवारी दि. ८ रोजी सकाळी बंद चाळीत ट्रॅक्टर दिसत नसल्याचा प्रकार विजय आहेर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती आपल्या जवळच्या लोकांना सांगितली. या प्रकाराबाबत देवळा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.
याप्रकरणी कडक कारवाईची मागणी
यानंतर आहेर यांनी गेल्या पाच-सहा दिवसांपासून आपल्या ट्रॅकटरची जिल्ह्यातील आजूबाजूला असलेल्या बाजार समितीच्या आवारात शोधाशोध सुरू केली असता रविवारी दि.१३ रोजी तब्बल सहा दिवसांनी दिंडोरी तालुक्यात एका खेड्यात रस्त्याच्या कडेला उभे असतांना आढळून आले. अज्ञात चोरट्यांनी यातील कांद्याची विल्हेवाट लावून या ठिकाणी ट्रॅकटर सोडून दिल्याचे समजते. आहेर यांनी ट्रॅकटर मिळून आल्याने सुटकेचा निश्वास सोडला असून पोलिसांनी या आरोपींचा कसून शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी सर्वत्र करण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम