जगताप – प्रतिनिधी: देवळा | भावडे येथील एस. के. डी. इंटरनॅशनल व व्ही. के. डी. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत देवळा येथे पार पडलेल्या कलर बेल्ट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
Deola | डॉ. नूतन आहेर व सुनील आहेर यांच्या हस्ते कार पाझर तलावाचे जलपूजन संपन्न
‘हे’ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण
शारीरिक सुदृढतेसाठी व स्वरक्षणासाठी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी येलो व ऑरेंज बेल्ट साठी सदर परीक्षा दिली. यात येलो बेल्ट स्पर्धेत सुयोग पगार, दर्शन देवरे, जयेश शेवाळे, आयुष्य देवरे, प्रेम सोनवणे, अमोल गोरे, चैतन्य गांगुर्डे, साहिल कानडे, तनवी देवरे यांनी तर ऑरेंज बेल्टसाठी लक्ष्मीकांत खैरनार, दिग्विजय हिरे साई सूर्यवंशी सिद्धार्थ सूर्यवंशी, भाविक राऊत, ऋषभ पाटील, हेमांगी खैरनार हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
Deola | पी.के. आप्पा आहेर पतसंस्थेच्या चेअरमनपदी डॉ.नूतन आहेर
कराटे प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य पाटील एस. एन. पाटील, व्ही. के. डी.चे प्राचार्य एन. के.वाघ यांनी विशेष कौतुक केले. कराटे प्रशिक्षक निलेश गुप्ता यांचेविद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. परीक्षेसाठी नाशिक जिल्हा सीनियर प्रशिक्षण सेंसाई शेखर पगार व ग्रामीणचे अध्यक्ष सेन्साई जगदीश सोनवणे यांनी परीक्षक म्हणून काम बघितले. संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे, सचिव मीना देवरे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बबलू देवरे व सागर कैलास, हेमंत शिंदे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम