सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | येथील श्री.पी.के.(आप्पा) आहेर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. नूतन सुनील आहेर तर व्हा. चेअरमनपदी सुरेखा युवराज मेधने यांची बिनविरोध निवड झाली. येथील पतसंस्थेच्या कार्यालयात त्यांचे अभिनंदन करत सत्कार करण्यात आला.
Deola | कणकापूर येथील गोशाळेला शासनाकडून अनुदान
डॉ. नूतन आहेर व सुरेखा मेधने यांची बिनविरोध निवड
पतसंस्थेचे चेअरमन प्रफुल्ल आहेर व व्हा. चेअरमन कैलास आहेर यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने ही निवड करण्यात आली. सहाय्यक निबंधक कार्यालयात सहकार अधिकारी ज्ञानेश्वर आहिरे यांच्या उपस्थितीत चेअरमन म्हणून डॉ. नूतन आहेर व व्हा. चेअरमन म्हणून सुरेखा मेधने यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी झालेल्या सत्कार कार्यक्रमात पतसंस्थेत महिलराज आल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करत नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर चांगला निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
Deola | देवळ्यातील मराठी शाळे जवळील दुकानांतून 91,800 रु. माल चोरट्यांनी केला लंपास
कार्यक्रमावेळी यांनी दर्शवली उपस्थिती
यावेळी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सुनील (गोटूआबा) आहेर, प्रफुल्ल आहेर यांचे सह जाणीव पतसंस्थेचे चेअरमन भाऊसाहेब पगार, अमृतकार पतसंस्थेचे चेअरमन भारत कोठावदे, सुराणा पतसंस्थेचे माजी संचालक अशोक सुराणा, बालाजी पतसंस्थेचे चेअरमन पवन अहिरराव, सुराणा पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन संजय कानडे, मधुकर पांडुरंग मेतकर पतसंस्थेचे संचालक विष्णू जाधव, शांताई पतसंस्थेचे चेअरमन जिभाऊ शिंदे तसेच माजी नगरसेविका वत्सला आहेर, जयश्री आहेर, विजय मेतकर, केशव खैरनार, ललित निकम, मयूर आहेर, तुषार आहेर, युवराज मेधने, किशोर खरोटे, भूषण पवार, सतीश कचवे, मयूर शेळके, प्रशांत पगारे, हेमंत देवरे आदी उपस्थित होते. व्यवस्थापक रवींद्र गोसावी यांनी आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम