Deola | कणकापूर येथील गोशाळेला शासनाकडून अनुदान

0
45
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | शासनाने गायीला राज्यमातेचा दर्जा दिल्याने तालुक्यातील कनकापूर येथील सोनशाम गोशाळेच्या वतीने पशु सवंर्धन विभागाच्या सहायक आयुक्त डॉ. मेघा पाटील यांच्या हस्ते गॊशाळेतील गायिंचें पूजन करण्यात आले. तसेच या गोशाळेला गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेंतर्गत मंजूर निवारा शेड व पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन उपसस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Deola | देवळ्यातील मराठी शाळे जवळील दुकानांतून 91,800 रु. माल चोरट्यांनी केला लंपास

कार्यक्रमास यांनी दर्शवली उपस्थिती

या कार्यक्रमास नायब तहसीलदार बबन आहिरराव, पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. नचिकेत कडाळे, रामेश्वर गोशाळेचे अध्यक्ष सुनिल देवरे, नांदगांव वृदांवन गोशाळेचे अध्यक्ष माधवराव निकम, पोलीस हवालदार गवळी, शेख आदींसह खर्डे येथील प्रगतिशील शेतकरी व विकास सोसायटीचे संचालक कारभारी जाधव, एकनाथ शिंदे, दादाजी शिंदे, भिका सुर्यवंशी, कनकापुर तंटामुक्तिचे अध्यक्ष रवींद्र बर्वे, साहेबराव साळुंके, कनकापूर गोशाळेच्या संचालिका सुनिता शिंदे, सचिव सतिष देवरे, सरचिटणिस समिर पगार, उपाअध्यक्ष भास्कर चव्हाण, किशोर शिंदे, अर्चना शिंदे आदीं ग्रामस्थ उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here