सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियांतर्गत तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय तृतीय क्रंमाकाचे रुपये तीन लाखाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. माळवाडी ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियांतर्गत सन २०२२/२३ मध्ये जिल्हास्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली.
याबद्दल जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वछता विभागाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेअंतर्गत रुपये तीन लाखाचे तृतीय क्रंमाकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी सरपंच अलकाबाई पवार, उपसरपंच मयूर बागुल, ग्रामसेवक एस. एस. देवरे, दावल भदाणे, जयवंत गोसावी, ग्रामपंचायत सदस्य हर्षाली बच्छाव, तात्याभाऊ भदाणे, कल्पना शेवाळे, प्रवीण गांगुर्डे, अरुणा पवार, हेमंत बागुल, नेहा बागुल, गायत्री आहिरे, ग्रामपंचायत कर्मचारी संजय सोनवणे, अमित सोनवणे, रुपाली आहेर आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम