Deola | देवळा पब्लिक स्कूलच्या बाॅलबॅडमिंटन संघाची विभागीय स्तरावर निवड

0
24
#image_title

सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या बॉल बॅडमिंटन स्पर्धा भावडे येथील एसकेडी स्कुलमध्ये संपन्न झाल्या. यात १७ वर्षे वयोगटातील देवळा पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी यश संपादन करून या संघाची विभागीय स्तरावर निवड झाली.

Deola | ग्रामविकास समितीचे अध्यक्ष संजय दहिवडकर यांनी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले

क्रीडा शिक्षक व माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन

या स्पर्धेत चैतन्य पाडवी, प्रभू शिंदे, दर्शन नावळे, वेदांत धूम, दर्शन पाडेकर, साई बोराडे, युवराज भोये, तुषार सूर्यवंशी, ‌वैभव दिवे, रविंद ‌कुंदे, यांनी उत्कृष्ट खेळ करत यश संपादन केले. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक सुनिल देवरे सर, माजी विद्यार्थी यांचे मार्गदर्शन लाभले.

Deola | देवळा पोमोग्रेनेट ॲग्रो फार्मर्स प्रोडूसर कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

उत्कृष्ट खेळाडूंचे गटविकास अधिकारी राजेश कदम, गटशिक्षणाधिकारी पब्लिक स्कुलचे प्राचार्य सतिश बच्छाव, एसकेडीचे प्राचार्य सुनिल पाटील, प्राचार्य वाघ आदींसह तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक, कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here