सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | विजेच्या लपंडावाने देवळा शहरासह तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले असून छोट्या मोठ्या उद्योजकांना व्यवसाय करणे अवघड झाले तर बिबट्याच्या भीतीने शेतकरी रात्रीच्या वेळी कांदा व इतर पिकांना पाणी देण्यास धास्तवाले असून यासाठी मोठ्या आवाजाच्या फटाक्यांचा वापर ग्रामीण भागातील शेतकरी करतांना दिसत आहेत. देवळा शहरात दिवसभरात दहा ते पंधरा वेळा वीज ये-जा करते तर सायंकाळच्या वेळी दोन ते तीन तास शहर अंधारात असते, छोट्या उद्योजकांनी बँकेतुन कर्ज काढून आपले व्यवसाय सुरू केलेले असतात. वीज नसल्यामुळे त्याचा फटका त्यांच्या व्यवसायाला बसून कर्ज काढलेल्या बँकाचे प्रतिनिधी अल्पबचत जमा करण्यासाठी येतात तेव्हा त्यांना रिकाम्या हाती परतावे लागते. त्यामुळे त्या व्यवससायीकांना कर्ज बाजारी पणाला सामोरे जावे लागते आहे.
Deola | जि.प.च्या सेस योजनेसाठी पंचायत समिती स्तरावर लाभार्थी शेतकऱ्यांची निवड
Deola | वीज अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांना उडवाउडवीची विचित्र
यावेळी अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होतो तो नेमकी सायंकाळच्या वेळी वीज का गायब होते, विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत असतांना अनेकांना अधिकारी फोन उचलत नसल्याचा अनुभव आला. तर काहींना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. गेल्या एक महिन्यापूर्वी देवळा सबस्टेशनला पन्नास वर्षे पूर्ण होऊन संपूर्ण मशनरी बदलण्यात आली व नव्याने उभारलेल्या मशनरी उभारून सुरळीत वीज पुरवठा करण्याची हमी दिली. मागील महिन्यात नुकताच देवळा सबस्टेशनला आय. एस. ओ. प्रमाणपत्र मिळून मोठे कौतुक करण्यात आले, मात्र त्यांतर वीज खंडित होण्याची परंपरा सुरू झाल्याने जुनीच मशनरी बरी होती असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली.
Deola | वसाका विक्री न करता भाडेतत्त्वावर सुरू करण्याचा राज्य सहकारी बँकेचा निर्णय
देवळा तालुका वीज वितरण विभाग एकेकाळी महाराष्ट्रत प्रथम क्रमांकांचे समजले जायचे सण २००० साली अक्षय प्रकाश योजना राबवुन १०० टक्के वीज पुरवणारा तालुका म्हणून मोठा गौरव करण्यात आला होता आणि सद्यस्थितीत वीज खंडित होण्याच्या प्रमाणामुळे महावितरण कंपनी बदनाम होत आहे.
शहरासह परिसरात एक हजाराहुन अधिक सौर ऊर्जेच्या माध्यमातून देवळा सबस्टेशनला वीज पुरवली जात असून वीज पुरवठा खंडीत होण्याचे कारण काय..! असा प्रश्न उपअभियंता कुमावत यांना विचारला असता त्यांनी वीज साठवण करता येत नाही अख् प्रश्नां? विचारल्यावर अस आदंटाळाटाळ केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम