सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | तालुक्यात डेंग्यु सदृश्य रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या स्तरावर कीटकनाशक फवारणी, स्वच्छता आदी उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुधीर पाटील, विस्तार अधिकारी राजेश निकुंभ यांनी दिली. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गावागावात बखळ जागेवर गाजर, गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. घरांच्या आजूबाजूला घाणीचे साम्राज्य व पाण्याच्या डबक्यामुळे डासांचे प्रमाण देखील वाढले असून, इतर साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यात डेंग्यु सदृश रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतांना दिसून येत आहे.
Deola | देवळ्यात विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
Deola | आपल्या जिल्ह्यात डेंग्यू नियंत्रणात आणावा याकरिता उपाय योजना राबवाव्या
ग्रामपंचायतीनी आपापल्या गावामध्ये विटकशास्त्रीय व कंटेनर सर्वेक्षण करावे, गावातील परीसर स्वच्छ ठेवावा, आपल्या स्तरावरुन, अबेटिंग, फॉगींग मशिन उपलब्ध करुन धुरफवारणी करावी जेणेकरुन करुन डासाची घनता कमी होईल, गावातील डासोत्पत्ती स्थाने शोधुन नष्ट करणे, तुंबलेल्या गटारी, नाले वाहते करावीत, सखल भागात पाण्याचे डबके साचू नये म्हणून उपाययोजना करावी, वापरात येणा-या पाण्यात टेमीफॉस द्रावण टाकुन डास आळया नष्ट करावीत, मोठ्या पाणीसाठ्यामध्ये गप्पी मासे सोडावेत, आठवडयातुन एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात यावा.
Deola | जि.प.च्या सेस योजनेसाठी पंचायत समिती स्तरावर लाभार्थी शेतकऱ्यांची निवड
याप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रात डेंग्यु उद्रेक होणार नाही याबाबत वरीलप्रमाणे उपाययोजना करण्यात याव्यात असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील, विस्तार अधिकारी राजेश निकुंभ यांनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम