सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | तालुक्यातील गुंजाळ नगर येथील उपसरपंच यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून बुधवार (दि.२८) रोजी देवळा तहसीलदारांकडे दोन विरुद्ध नऊ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. येत्या २ सप्टेंबर रोजी या अविश्वास प्रस्तावावर तहसीलदार यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात येऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
Deola | छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे ‘मुक आंदोलन’
याबाबत देवळा तालुक्यातील गुंजाळ नगर येथील उपसरपंच यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर इतर सदस्यांनी उपसरपंच हे सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात. गावाच्या विकासाठी वेळोवेळी ठोस निर्णय घेत नाहीत. ग्रामपंचायतीचा कारभार एकतर्फी चालवतात. गावाच्या दृष्टीकोनातून काम करत नाही. या कारणावरून त्यांच्यावर तहसील कार्यालयात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या पत्रावर सरपंच शरद गायकवाड, ग्रामपंचात सदस्य शंकर वाघ, स्वाती गुंजाळ, जिजाबाई गांगुर्डे, शीतल गुंजाळ, कमळाबाई माळी, आशाबाई जाधव, तुषार गुंजाळ, सुनील पगारे ह्या नऊ सदस्यांच्या सह्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम