सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | तालुक्यातील वाखारी येथील सरपंच, उपसरपंच यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून बुधवार (दि.२८) रोजी देवळा तहसीलदारांकडे तीन विरुद्ध दहा ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. येत्या ३ सप्टेंबर रोजी या अविश्वास प्रस्तावावर तहसीलदार यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात येऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. याबाबत देवळा तालुक्यातील वाखारी येथील सरपंच, उपसरपंच यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर पदाधिकारी सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात.
Deola | देवळा येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने निषेध आंदोलन
गावाच्या विकासाठी वेळोवेळी ठोस निर्णय घेत नाहीत. ग्रामपंचायतीचा कारभार एकतर्फी चालवतात. सरपंच, उपसरपंच हे गावाच्या दृष्टीकोनातून काम करत नाही. या कारणावरून त्यांच्यावर तहसील कार्यालयात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. या पत्रावर ग्रामपंचात सदस्य कल्पना चव्हाण, पुनाजी भदाणे, धुडकु अहिरे, सुनीता गुंजाळ, अलका पवार, बाजयाबाई वाघ, रवींद्र वाघ, आक्काबाई वाघ, उज्ज्वला अहिरे, विलास पवार यांच्या सह्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम