
देवळा : देवळ्याचे भूमिपुत्र, माजी आमदार शांतारामतात्या आहेर यांच्या निधनानंतर आहेर कुटुंबियांच्या सांत्वनासाठी आज गुरुवार (दि.२७) रोजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी तात्यांच्या कार्याला उजाळा देत आठवणी जागवल्या. यावेळी (स्व.)तात्यांचे पुत्र बाजारसमितीचे माजी सभापती योगेश आहेर, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत आहेर, प्राचार्य हितेंद्र आहेर, दिलीप आहेर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडितराव निकम, भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण आदी उपस्थित होते.

माजी आमदार शांतारामतात्या आहेर यांचे (दि.२१) रोजी निधन झाले . संपूर्ण राज्यासह जिल्ह्यातील राजकीय ,सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींबरोबरच कसमादेतील प्रत्येक गावातून येणाऱ्यांची रीघ लागली आहे . गेल्या पाच-सात दिवसांत अनेक मान्यवरांनी हजेरी लावत आहेर कुटुंबियांचे सांत्वन केले. केंद्रीय राज्यमंत्री डॉ.पवार यांनी यावेळी कुटुंबातील महिलावर्गाची भेट घेत त्यांचेही सांत्वन केले. तसेच उपस्थित पदाधिकारी यांच्याशी चर्चा करत समस्या जाणून घेतल्या. बीएसएनएल कार्यालयात कोणी कर्मचारी नसल्याने थेट फोन करत याबाबत विचारणा केली. तसेच निवेदनही स्वीकारली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम