Skip to content

देवळा येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ ; हिरे कुटुंबावर दिवाळीत दुःखाचा डोंगर


देवळा | सोमनाथ जगताप
गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेला देवळा येथील तरुणाचा मृतदेह आज गुरुवारी ( २७) रोजी दुपारी देवळा येथील कोलथी नदीवरील के टि वेअर मध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून , एन दिवाळी हिरे कुटुंबावर दिवाळीत दुःखाचा डोंगर कोसळल्याने देवळा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि ,देवळा येथील सलून व्यावसायिक तुषार काशिनाथ हिरे ( ३९ ) हा तरुण सोमवार दि २४ रोजी दिवाळीच्या दिवशी पहाटे साडे पाच वाजेपासून बेपत्ता होता .त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला होता . तशी तक्रार हिरे यांच्या नातेवाईकांनी देवळा पोलिसांत दिली होती . सर्व ठिकाणी संपर्क करून देखील त्याचा शोध लागत नसल्याने एन दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे चिंता व्यक्त करण्यात आली . अखेर तुषार हिरे याचा मृतदेह गुरुवारी ( २७) रोजी दुपारी देवळा येथील कोलथी नदीवरील के टि वेअर मध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे .घटनेची माहिती मिळताच नदी काठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन हिरे याचा मृतदेह बाहेर काढण्यात आल .

या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .हिरे याच्या पश्चात आई ,पत्नी एक मुलगा ,एक मुलगी असा परिवार आहे . हिरे यांच्यावर देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन , मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात देण्यात आले . देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून , अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे यांच्या मार्गर्शनाखाली त्यांचे सहकारी करीत आहेत .

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!