Deola demco bank: देमको बँकेस तीन कोटी २४ लाख १० हजार रुपयांचा नफा

0
6

Deola demco bank : देमको बँकेस या आर्थिक वर्षात तीन कोटी २४ लाख १० हजार रु. इतका ढोबळ नफा झाला असून नेट एनपीए 0 टक्के असल्याची माहिती देमकोच्या चेअरमन कोमल कोठावदे यांनी बुधवार (दि.५) रोजी दिली. तर थकबाकीदार सभासदांवर कठोर कारवाईचा बडगा उगारत चौकाचौकात बॅनर लावून थकबाकीदार सभासदांवर कलम १०१ अंतर्गत स्थावर जंगमजप्तीची कार्यवाही केल्याने वसुलीस चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे व्हा.चेअरमन डॉ.प्रशांत निकम यांनी सांगितले. (Deola demco bank)

मागील आर्थिक वर्षाचा आढावा देतांना ते बोलत होते. देवळा व परिसरातील शेतकरी व्यापारी आणि सामान्य नागरिकांसाठी परिचित असलेल्या देमको बँकेस ३१ मार्च अखेर तीन कोटी २४ लाख दहा हजार रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. १९ जानेवारी १९६१ रोजी स्थापन झालेल्या या नागरी सहकारी बँकेचे भाग भांडवल तीन कोटी २४ लाख रुपये असून, अ वर्ग सभासद ४८८० इतके आहेत. एकूण ठेवी ७६ कोटी दोन लाख जमा झाले असून यातील गरजू व आर्थिक दृष्ट्या सर्वसाधारण असलेल्या व्यक्तींना कर्ज स्वरूपात ५३ कोटी ७२ लाखांचे कर्ज वाटप केलेले आहे. तसेच बँकेने ४९ कोटी ७० लाखांची सुरक्षित गुंतवणूक केलेली आहे. बँकेचा सीआर एआर ४४.९९ टक्के इतका असून मार्चअखेर नेट एनपीए शून्य टक्के आहे. बँकेच्या सर्व आवश्यक तरतुदी वजा जाता एक कोटी २६ लाखाचा निव्वळ नफा झाला आहे. (Deola demco bank)

यावेळी जनसंपर्क संचालक योगेश वाघमारे, संचालक जयप्रकाश कोठावदे, राजेंद्र सूर्यवंशी, अनिल धामणे, केदारनाथ मेतकर, राजेश मेतकर, भगवान बागड, प्रमोद शेवाळकर, योगेश राणे, हेमंत अहिरराव, मयूर मेतकर, अमोल सोनवणे, सुभाष चंदन, मनिषा शिनकर, नलिनी मेतकर, भारत कोठावदे, सचिन कोठावदे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील भालेराव, व्यवस्थापक नितीन बोरसे, व सेवकवृंद उपस्थित होते.

देवळा तालुक्यात सावरकर यात्रा उत्साहात संपन्न

“मागील आर्थिक वर्षात सभासद अपघात विमा रु.एक लाखांवरून वाढवून दोन लाख करण्यात आला आहे. तसेच महिलांसाठी ठेवींवर अर्धा टक्का जादा व्याजदर दिल्याने महिलांच्या ठेवी वाढण्यास मदत झाली आहे. ५०० रु.त बचत खाते उघडण्याची सोय केल्याने महिला खातेदारांची संख्या ५०० ने वाढली आहे.”
कोमल कोठावदे, चेअरमन, देमको

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here