सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता संहिता अंमलबजावणीसाठी गस्तीवर असलेल्या राज्य उत्पादन शुल्कच्या मालेगाव विभाग पथकाने शनिवारी (दि.३०) देवळा – नाशिक मार्गावर रामेश्वर शिवारात मोठी कारवाई केली. आयशरच्या चोर कप्प्यातून होणारी अवैध मद्यवाहतूक रोखण्यात आली. वाहनासह 23 लाख13 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चालकाला अटक केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या आदेशान्वये, नाशिक विभागीय उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.(Deola)
मालेगावचे निरीक्षक लिलाधर पाटील, दुय्यम निरीक्षक हर्षराज नामदेव इंगळे, सहायक दुय्यम निरीक्षक वंदना देवरे यांच्या पथकाने शनिवारी रामेश्वर शिवारात (देवळा ) नाशिक रोडवर सापळा रचला. संशयित आयशर (MH 08 W 7722 ) ची तपासणी करण्यात आली. वरकरणी रिकामे भासणाऱ्या या वाहनाच्या ड्रायव्हर कॅबीनच्या मागच्या बाजुस व गाडीच्या ट्रॉलीच्या पुढच्या बाजुस एक चोर कप्पा मिळून आंला. चोर कप्यास मागील बाजुने मध्ये जाण्यासाठी कोणताही मार्ग नव्हता. परंतु, ड्रायव्हर कॅबीनच्या वर चढुन ताडपत्री सोडुन बघितले असता चोर कप्प्यात अगदी तंतोतंत प्रमाणात फक्त 201 बॉक्स बसतील, अशी व्यवस्था करण्यात आली होती.(Deola)
Deola | देवळा महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांची सैन्य दलात भरती
त्यात ऑल सिजन व्हिस्कीच्या 750 मिली. क्षमतेच्या एकुण 293 काचेच्या सिलबंद बाटल्या (24.5 बॉक्स), ऑल सिजन व्हिस्कीच्या 180 मिली. क्षमतेच्या एकुण 1920 काचेच्या सिलबंद बाटल्या. (40 बॉक्स), रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या 750 मिली. क्षमतेच्या एकुण 290 काचेच्या सिलबंद बाटल्या. (24.5 बॉक्स), रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या 180 मिली. क्षमतेच्या एकुण 1968 काचेच्या सिलबंद बाटल्या. (41 बॉक्स), डीएसपी ब्लॅक व्हिस्कीच्या 750 मिली. क्षमतेच्या एकुण 384 काचेच्या सिलबंद बाटल्या. (32 बॉक्स), डीएसपी ब्लॅक व्हिस्कीच्या 180 मिली.(Deola)
क्षमतेच्या एकुण 1488 काचेच्या सिलबंद बाटल्या. (31 बॉक्स), वोल्फ स्टोन व्हिस्कीच्या 750 मिली. क्षमतेच्या एकुण 96 काचेच्या सिलबंद बाटल्या (8 बॉक्स) असा मद्यसाठा मिळून आला. महाराष्ट्र राज्यात वाहतुकीस व विक्रीस प्रतीबंध असलेला मुद्देमाल अवैधरित्या विना परवाना वाहतुक केल्याप्रकरणी वाहनचालक ओमप्रकाश हिरालाल यादव त्यास अटक करण्यात आली. तसेच गुन्हयातील मद्यसाठा घेणारा व पुरवठादार यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
Deola | डोंगरगावात राज्य उत्पादन शुल्क पथकावर हल्ला; आरोपींना अटक
कुणालाही अवैध मद्यनिर्मिती, विक्री, वाहतुकीबाबत काही माहिती असल्यास विभागाच्या टोल फ्री क्र. १८००२३३९९९९ अथव व्हाटस्अॅप तक्रार क्र.८४२२००११३३ यावर माहिती द्यावी. माहिती पुरवणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
– लिलाधर वसंत पाटील,
निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मालेगाव.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम