Deola-Chandwad | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर देवळा-चांदवड मतदारसंघात राजकीय समीकरण बदलली असून उमेदवारी न मिळाल्याने नाराजी नाट्य सुरू होते. निवडणुकीसाठी इच्छुक असलेले भाजपचे नेते केदा आहेर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याकडून नाराज उमेदवारांना मनवण्याचे कार्य सोपविण्यात आले होते. परंतु त्यामध्ये वरिष्ठ नेते अपयशी ठरले असून केदा आहेर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. त्यानंतर आता अपक्ष उमेदवार केदा आहेर, डॉ. आत्माराम कुंभार्डे आणि संजय जाधव यांनी तातडीने पत्रकार परिषद बोलावली आहे.
Chandwad-Deola | मंत्रीपदाची अशी हाव की भावाच्याच पाठीत घातला घाव..?
अपक्ष उमेदवारांकडून नव्या आघाडीची घोषणा
यावेळी, “पक्षाकडून उमेदवारीची अपेक्षा होती. मात्र आम्हाला एबी फॉर्म मिळाला नसल्याने आम्ही भरलेले उमेदवारी अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून धरले गेले आहेत. तसेच विद्यमान आमदारांकडून आम्हाला या दोन्ही भागातील सर्वात मोठ्या समस्येवर म्हणजेच, पाण्याच्या समस्येवर तोडगा निघेल अशी अपेक्षा होती. परंतु विद्यमान आमदार त्यामध्ये सपशेल फेल ठरले असून आम्ही हीच गोष्ट लक्षात ठेवत अपक्ष उमेदवार म्हणून एकत्र येत या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सक्षम असलेल्या उमेदवाराला पुढे करून चांदवड-देवळा परिवर्तन विकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तसेच जो कोणी उमेदवार आम्हाला हा प्रश्न सोडविण्यासाठी आश्वासन देईल त्याला उमेदवार देण्याचे ठरवले होते. त्यानुसार, केदा नानांनी आम्हाला ते आश्वासन दिले असल्यामुळे आम्ही ‘चांदवड देवळा परिवर्तन विकास आघाडी’कडून केदा आहेरांना उमेदवारी जाहीर करत आहोत” अशी घोषणा यावेळी डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी केली.
Chandwad-Deola | घात झाला घात..!; दाखवून त्यागाचा लळा केसानेच कापला गळा..?
“पक्ष जी कारवाई करेल त्याला सामोरे जाण्याची तयारी”
तसेच “पक्ष जी कारवाई करेल, त्याला सामोरे जाण्यास आम्ही तयार असून आजूबाजूचे मतदारसंघ हे विकासाच्या दृष्टीने आपल्यापासून अनेक पटींनी पुढे निघून गेले आहेत. यामुळे आमचा नानांना पाठिंबा आहे.” अशी भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली आहे. या मध्ये डॉ. आत्माराम कुंभार्डे, माजी आमदार उत्तम भालेराव, देवळा बाजार समिती सभापती योगेश आहेर, संजय जाधव, केदा आहेर, उमराणे बाजार समिती सभापती विलास देवरे, देविदास चौधरी या प्रमुख नेत्यांसह तालुक्यातील महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम