देवळा कळवण रस्त्यावर अपघात ; वरवंडी येथील युवक ठार

0
1

देवळा ; देवळा कळवण रोडवर बुधवारी (दि २१ )रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास देवळ्यानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेने वरवंडी ता देवळा येथील एक युवक ठार झाला असून , दोन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत .

अज्ञात वाहन फरार आहे .जखमींवर सटाणा येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत .या घटनेचा देवळा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि , बुधवारी (दि २१) रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वरवंडी ता देवळा येथील युवक रोहित शिवाजी आहेर ( १९ ) हा देवळा येथे शिकवणी (क्लास)साठी गेलेली बहीण अक्षरा शिवाजी आहेर (१६) हिला घेण्यासाठी आपल्या हिरो होंडा मोटरसायकल क्रमांक एम एच ४१ / एल २२१० गेला होता .

तिला घेऊन घरी येत असताना देवळा कळवण रोडवरील बाजार समितीच्या जवळपास समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने यात रोहित आहेर हा गंभीर जखमी झाला. व त्याच्या मागे बसलेली त्याची बहीण अक्षरा आहेर व गायत्री सोनवणे या अपघात जखमी झाल्या . या तिघांवर देवळा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना सटाणा येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले .

उपचारादरम्यान रोहित आहेर या युवकाचा मृत्यू झाला . या घटनेने वरवंडी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . अज्ञात वाहन फरार असून, देवळा पोलीस ठाण्यात मोटर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात असून,आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान ,मयत रोहित याच्यावर आज गुरुवारी(२२) रोजी दुपारी १२ वाजता वरवंडी गावांत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई ,वडील ,एक बहीण असा परिवार आहे. देवळा कळवण रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून, जागोजागी मोठं मोठी खड्डे पडली आहेत .

राज्य मार्ग असल्याने या रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर आहे . खराब रस्त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत . याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. देवळा ते कळवण या रस्त्यावर अवजड वाहने तसेच सप्तश्रृंगी गडावर जाण्यासाठी हा तालुक्यातील मुख्य रस्ता असून रस्त्याची अतिशय बिकट परिस्थिती झाली आहे .या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांनी आपला जीव गमवला आहे . प्रशासन अजून किती गंमत बघणार आहे . असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here