Crime News | प्रेयसीच्या अश्लील व्हिडीओचं मेमरीकार्ड प्रत्येक घरासमोर ठेवलं

0
13
Crime News
Crime News

Crime News |  मुंबई ही स्वप्न नगरीकडून आता गुन्ह्यांची नगरी बनत आहे. दिवसेंदिवस मुंबईत धक्कादायक प्रकार उघडकिस येत आहेत. यातच आता आणखी एक हादरवणारी घटना मुंबईतून समोर आली असून, या घटनेत एका माथेफिरू आरोपीने संबंधित पीडित तरुणीची बदनामी करण्यासाठी चक्क तिचे अश्लील व्हिडिओ असलेले मेमरी कार्ड हे तिच्या सोसायटीतील सर्व घरांसामोर ठेवले. तसेच धमकावत तिच्यावर वारंवार बलात्कार केला आहे.

या घटनेत एका २२ वर्षीय तरूणीचे अश्लील व्हिडिओ शूट करून त्याच्या आधारे धमकावत संबंधित तरूणीवर वारंवार शारीरिक अत्याचार करण्यात आला आहे.  आणखी हादरवणारी बाब म्हणजे पीडित तरूणीने या माथेफिरू आरोपीच्या मागणीला नकार दिल्याने त्याने ते अश्लील व्हिडिओ असलेले मेमरीकार्ड व त्यांचे व्हॉट्सॲपवरील संभाषणाचे प्रिंट काढली आणि संबंधित पीडित तरूणी राहत असलेल्या सोसायटीतील प्रत्येक घराच्यासमोर नेऊन ठेवले. याप्रकरणी संबंधित आरोपी विरुद्ध साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरवैया बुसिरासी (वय ४१ वर्षे) असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे.(Crime News)

 Crime News | खाकीनेच केला घात; मजूर महिलेवर पोलिसाने केला बलात्कार

Crime News | नेमकं प्रकरण काय..?

अधिक माहितीनुसार, पीडित तरूणी ही नवी मुंबई येथील रहिवासी आहे. ती आरोपीला पूर्वीपासूनच ओळखत होती. या दोघांमध्ये २०१९ मध्ये प्रेमसंबंध होते. यावेळी फेब्रुवारी २०१९ याकाळात या आरोपीने पीडित तरूणीला लॉजवर नेले व तेथे तिच्यावर जबरदस्ती करत शारीरिक संबंध ठेवके व त्याचे व्हिडिओ शूट केले. त्यानंतर ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने वारंवार तिच्यावर बलात्कार केला.

तो अनेक दिवसांपासून संबंधित पीडित तरूणीला धमकावत होता. दरम्यान, वैतागून संबंधित तरूणीने त्याला नकार दिल्यानंतर आरोपीने ती राहत असलेल्या सोसायटीमतील सर्व घरांच्या दरवाज्यांसमोर एक-एक पाकीट ठेवले आणि त्या पाकीटांमध्ये पीडित तरूणीचे अश्लील व्हिडिओ असलेले मेमरी कार्ड आणि त्यांच्या व्हॉट्सॲप चॅटचे प्रिंटआऊट होते. एवढंच नव्हे तर त्या पाकीटात या तरूणीबद्दल काही अश्लील गोष्टी लिहून तिची बदनामी केली आहे.(Crime News)

Rape Case | ॲपवर ओळख अन्..; शासकीय ठेकेदाराचे महिलेवर अमानुष अत्याचार

तरीही छळ कायम… 

यामुळे पीडित तरूणी ही झालेल्या बदनामीमुळे घाबरल्यामुळे ती लगेच पोलिस ठाण्यात गेली नाही. यामुळे त्यानंतरही हा आरोपी तिला त्रास देतच होता, तिचा छळ करत होता. दरम्यान, अखेर हा सर्व प्रकार असह्य झाल्याने तिने जवळील  साकीनाका पोलिस स्टेशन गाठले आणि आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा पुढील तपास साकीनाका पोलिस करत आहेत.(Crime News)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here