Crime News | पत्नीसह मुलालाही संपवलं; बिझनेसमनच्या घरात मृत्यूचं तांडव

0
12
Nashik Crime News
Nashik Crime News

Crime News | सध्या महाराष्ट्र गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. यातच आणखी एक धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे.  या दुहेरी हत्याकांडाने कल्याण शहर हादरलं आहे. एका बिझनेसमॅनने त्याची पत्नी आणि सात वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचं उघड झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ माजलेली आहे. कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर आरोपी बिझनेसमन घरातून फरार झालेला आहे. दीपक गायकवाड असे आरोपीचे नाव असून त्याने पत्वी अश्विनी आणि सात वर्षांच्या मुलाचे आयुष्य संपवले. (Crime News)

Michaung Cyclone | बंगाल उपसागरात चक्रीवादळ; राज्यात पुन्हा अवकाळीचा धोका

या घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फरार आरोपी दीपक गायकवाड याचा पोलिस कसून शोध घेता आहेत. दरम्यान ही हत्या नेमकी का झाली, याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

नेमकं घडलं काय…

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक गायकवाड हा पत्नी आणि मुलासह कल्याण पश्चिमेकडील रामबाग लेन नंबर तीनमधील एका इमारतीत राहत होता. त्यांचे कल्याण शहरातच नानूज वर्ल्ड नावाचे खेळण्यांचे दुकान आहे. काल दुपारी दीपक याने त्याच्या एका नातेवाईकाला फोन केलेला होता. त्यांच्याशी बराच वेळ फोनवरून बोलणंही झालं होतं. मात्र त्यानंतर अचानक काय झालं माहीत नाही, पण त्याने त्याची पत्नी आणि लहान मुलाचा गळा दाबून, दोघांचीही हत्या केली. एवढेच नव्हे तर त्याने स्वत:चं आयुष्य संपवण्याचाही प्रयत्न केला मात्र थोड्या वेळाने तो घटनास्थळावरून फरार झालेला आहे.

घरातील दृश्य पाहून नातेवाईक हादरले

फोन केल्यानंतर दीपकचे नातेवाईक जेव्हा त्याच्या घरी पोहोचले तेव्हा समोरील दृश्य पाहून ते सगळेच हादरून गेले. घरामध्ये दिपक गायकवाड याची पत्नी आणि लहान मुलाचा मृतदेह होता. तर हत्येनंतर दीपक गायकवाड हा फरार झाला. हादरलेल्या नातेवाईकांनी कसाबसा धीर गोळा करत महात्मा फुले पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले होते. पोलिस आरोपीचा शोध घेता आहेत.

Sunita patil: माऊली पुन्हा सेवेत हजर होईल; पालकमंत्री भुसे यांनी व्यक्त केला विश्वास


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here