Crime news | ऑनलाइन बिर्याणी मागवताय; तर सावधान..!

0
11
Delicioous delhi biryani

Crime news |  नवाबांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हैदराबाद येथून एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. हैदराबाद मधील बिर्याणी (biryani)ही खूप फेमस आहे. मात्र, तिच बिर्याणी मागवणं हे एका इसमाला खूप महागात पडलं आहे.

भूक लागली म्हणून ह्या व्यक्तीने झोमॅटोवरून चिकन बिर्याणी मागवली होती आणि थोड्याच वेळात ती घरी डिलीव्हरदेखील झाली. मात्र, जेव्हा त्या व्यक्तीने पॅकेट उघडलं, तेव्हा समोरचं ते किळसवाणं दृश्य पाहून तो बिथरलाच. कारण पॅकेटधील बिर्याणीत त्याला चक्क एक मेलेली पाल सापडली.(Crime news)

ह्या ऑर्डर केलेल्या चिकन बिर्याणीमध्ये (biryani) मेलेली पाल सापडल्यानंतर त्या व्यक्तीने X म्हणजे ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर ही पोस्टदेखील शेअर केली. झोमॅटोचा डिलीव्हरी बॉय हा चिकन बिर्याणीसोबत ही मेलेली पालदेखील घेऊन आला, असं त्याने ह्या ट्वीट मध्ये लिहीलं आहे.

बिर्याणीत सापडली पाल

हैदराबाद येथील डीडी कॉलनी येथे राहणाऱ्या व्यक्तीने ‘बावर्ची’ ह्या हॉटेलमधून झोमॅटोवरुन ऑनलाइन चिकन बिर्याणी मागवली होती. पण त्या बिर्याणीचे (biryani) पार्सल उघडल्यानंतर त्या बिर्याणीमध्ये मेलेली पाल सापडल्यामुळे घरातील संगळ्यांनीच संताप व्यक्त केला. संबंधित हॉटेलच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा राग हा अनावर झाला व त्यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट केली. असा अनुभव आल्यानंतर पुढील वेळेस ऑनलाइन जेवण मागवण्याआधी सर्वच किमान १० वेळा विचार करतील अशी ही घटना असल्याचीही भावना त्यांनी व्यक्त केली.(Crime news)

Crime News | विवाहीत प्रेयसीचे नग्न फोटो काढून उकळले 17 लाख; प्रियकराला अटक

झोमॅटोचा रिस्पॉन्स

यासंदर्भातील ही पोस्ट ऑनलाइन शेअर केल्यानंतर झोमॅटोने त्यावर उत्तर दिले आहे. “ही अतिशय गंभीर बाब आहे. आणि आम्ही त्याची दखल घेतलेली आहे. संबंधित कस्टमरशी आमचं बोलणं देखील झालेलं आहे. यापुढे असा प्रकार किंवा अशी चूक घडू नये यासाठी आम्ही काळजीपूर्वक सर्व पावले उचलू” असे स्पष्टीकरण झोमॅटोतर्फे देण्यात आलेले आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट वेगाने व्हायरल होत असून, नेटीझन्स त्यावर अनेक प्रतिक्रिया देत आहेत.

झुरळामुळे कोट्यवधींच्या व्यवसाय ठप्प 

मुंबईमधील अनेक नामांकित हॉटेलांपैकी एक असेलल्या “बडे मिया’ ह्या हॉटेलला टाळा लागलं आहे. १९४६ साली अवघ्या २० रूपयांमध्ये सुरु झालेलं हे हॉटेल आज कोट्यवधींचा व्यवसाय करत आहे. पण, एका झुरळाने त्यांच्या व्यवसायासाला मोठा ब्रेक लागला.(Crime news)

‘बडे मिया’ ह्या हॉटेलला सील करण्यात आल्याने सर्वसामान्यांनाच नाहीतर सेलिब्रिटींनाही मोठा धक्का बसला होता. कारण ह्या हॉटेलच्या किचनमध्ये उंदीर तसेच झुरळांचा वावर आढळून आला. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून छापा टाकत. त्यामुळे अनेक पिढ्यानपिढ्या सुरू असलेलं ‘बडे मिया’ ह्या हॉटेलला आता कुलूप लागलेलं आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here