Agriculture News | कधी दुष्काळी परिस्थिती तर कधी अवकाळीचा फेरा या नैसर्गिक संकटात आर्थिक कोंडी झालेल्या नाशकातील शेतकऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेल्या उन्हाळ कांद्याच्या बाजारभावामुळे काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. नाशिक तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी ऑगस्ट-सप्टेंबरमध्येच आपल्याकडील उन्हाळ कांदा विकून टाकला होता मात्र, ज्यांनी हा कांदा तो चाळीत साठवून ठेवला होता. त्यांच्या हाती गेल्या दोन महिन्यांत अधिकचे दोन पैसे पडले आणि येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ महिन्यांत 17 लाख 32 हजार 343 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक आणि विक्री झाली आहे. यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती 155 कोटी 42 लाख 44 हजार 715 रुपये पडले आहेत. (Agriculture News)
Crime news | ऑनलाइन बिर्याणी मागवताय; तर सावधान..!
उन्हाळ कांद्याने यंदाच्या हंगामातील सुरुवातीचे सहा महिने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेल्या कमी बाजारभावामुळे आर्थिक संकटात टाकलेले होते. यंदाच्या खरीप हंगामात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीचक्र बिघडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची खरी मदार चाळीत साठवलेल्या उन्हाळ कांद्याला मिळणाऱ्या बाजारभावावर अवलंबून होती मात्र एप्रिलपासून सप्टेंबरपर्यंत या कांद्याला म्हणावा तसा भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडलेले होते.
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत यावर्षीच्या एप्रिल महिन्यात उन्हाळ कांद्याची आवक होण्यास सुरुवात झाली होती आणि येथील बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवारात एप्रिल ते नोव्हेंबर 2023 पर्यंत 11 लाख 30 हजार 104 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. कांदा लिलावाद्वारे बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी हा कांदा खरेदी केला तसेच अंदरसूल उपबाजारात गेल्या आठ महिन्यात 6 लाख 2 हजार 239 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. दोन्ही ठिकाणी गेल्या आठ महिन्यात झालेली उन्हाळ कांद्याची एकूण आवक बघता त्यातून शेतकऱ्यांच्या हातात 155 कोटी रुपये पडले आहेत. सुरुवातीचे सहा महिने भाव कमी असल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली होती मात्र ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांत उंचावलेल्या बाजारभावाने उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. असे असले तरी येवला तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातच आपल्याकडील उन्हाळा कांदा विकून टाकलेला होता.
Crime | धक्कादायक! आइसक्रीम घेण्यासाठी गेलेल्या ८ वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळला पिशवीत
उन्हाळ कांद्याला मिळालेला दर (प्रतिक्विंटल)
महिना- किमान-कमाल- सरासरी
- एप्रिल- १००- ९३४- ७००
- मे- १०० – १,००० – ६५०
- जून – १००- १,५५३- ८२५
- जुलै- १५०- १,६२५- १,१५०
- ऑगस्ट – २००- २,५११- १,९००
- सप्टेंबर- ३००-२,४२५-१,८५०
- ऑक्टोबर- १,७००-५,४००-३,०००
- नोव्हेंबर- ७००- ४,७००- ३,०००