Corona Update | त्र्यंबकेश्वर, सिन्नरपाठोपाठ शहरातही कोरोनाचा वाढतोय कहर!

0
13
Coronavirus
Coronavirus

Corona Update | नाशिक : भारतात कोरोना पुन्हा एकदा आपला प्रसार वाढवत असताना कर्नाटकमधील  JN. 1 या कोरोनाच्या नव्या सबव्हेरिएंटने तिघांचा बळी घेतला आहे. यातच आता JN. 1 या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा महाराष्ट्रात प्रसार वाढू लागलेला असून महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा याहबाबत सज्ज झाली आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वरपाठोपाठ नाशिक शहरातील सिन्नर आणि दोडी येथून दोन रुग्ण दाखल झाले असून या दोन रुग्णांची कोरोना रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाबाबत आणखी सतर्क राहण्याची गरज आहे.

Crime News | माझ्याशी लग्न कर नाहीतर…; तरुणीसोबत केले धक्कादायक कृत्य

Corona Update | महात्मानगरातील दोन महिलांना तर अंबड परिसरातील एकाला करोनाची लागण

नाशिक जिल्ह्यात कोरोना पसरत असतानाच नाशिकमधील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्ह्यात तालुकानिहाय कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यासाठी स्क्रिनिंग सेंटर्स सुरू करण्यात आलेले आहेत. तसेच आता नाशिक जिल्हयातील कोरोनाबाबत एक मोठी अपडेट समोर आली असून त्र्यंबकेश्वर, सिन्नरपाठोपाठ नाशिक शहरातही करोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव झालेला आहे. महात्मानगर परिसरातील दोन महिलांना तर अंबड परिसरातील एका तरुणाला करोनाच्या सबव्हेरिएंट JN. 1 ची लागण झाल्याचे तपासणी अहवालातून स्पष्ट झाले असून त्यामुळे नाशिक महानगरपालिकेची आरोग्य-वैद्यकीय यंत्रणा जोरदार सज्ज झाल्याचं दिसून येत आहे.

Scheme | १०० रुपयांची गुंतवणूक करा आणि ४ कोटींचा भरघोस फंड मिळवा

नाशिक शहरात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने नागरिकांनी याबाबत काळजी घेण्याचं आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केलं आहे. आता शहरातही करोनाचे एकाचवेळी तीन रुग्ण आढळून आले असून महात्मानगर भागातील एका महिलेला सर्दी, खोकला अशी लक्षण दिसू लागल्यानंतर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर, या महिलेची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटीव्ह आढळून आली तसेच सध्या या महिलेवर उपचार सुरू आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here