Congress MLA | या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने 9 तर, महाविकास आघाडीने 3 उमेदवार उभे केले होते. 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात असल्याने महाविकास आघाडीत असलेल्या शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला. काँग्रेसचे आमदार (Congress MLA) फुटल्याने जयंत पाटलांचा पराभव झाल्याचे सांगितले जात आहे. तर, काँग्रेसचे एकूण सात आमदार फुटल्याचे काँग्रेस नेत्यांनीही मान्य केले असून, या फुटीर आमदारांवर कारवाई केली जाणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले.
दरम्यान, नुकतीच काही दिवसांपूर्वी काही माध्यमांनी सात काँग्रेस आमदारांची नावं जाहीर करत त्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा दावा केला होता. यात इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे (Igatpuri-Trimbakeshwar Constituency) काँग्रेस आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) यांच्याही नावाचा समावेश होता. यानंतर आपण पक्षाचा आदेश पाळला असून, आपली बदनामी केली जात असल्याचे म्हटले होते.
नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून आमदार नाराज
यावर आमदार हिरामण खोसकर ( MLA Hiraman Khoskar) यांनी व्हिडीओ प्रसिद्ध करत स्पष्टीकरण दिले. यात त्यांनी सदर प्रकरणाची दखल घेऊन वरिष्ठांनी माध्यमांद्वारे सुरु असलेली माझी बदनामी थांबवावी. मी पक्षाने सांगितल्यानुसारच मतदान केले असल्याचे खोसकर यांनी स्पष्ट केले होते. यानंतर आता माध्यमांना प्रतिक्रिया देतांना आमदार हिरामण खोसकरांनी थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला असून, यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस पक्षातील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहे. तर, नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून पक्षातील अनेक आमदार नाराज असल्याचा दावाच खोसकरांनी केला. (Congress MLA)
Congress MLA | ‘त्या’ फुटीर आमदारांची नावे समोर; नाशिकच्याही एका आमदाराचा समावेश..?
Congress MLA | कार्यकर्त्यांशी बोलून पुढील भूमिका घेणार
“नाना पटोले (Nana Patole) जे जेव्हापसून काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष झालेत. तेव्हापासून पक्षातील अनेक आमदार (MLA) हे नाराज आहेत. आता मी त्यांची नावे सांगत नाही. मात्र पक्षातील अनेक आमदारांनी नाना पटोलेंची पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारदेखील केली असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट असे आमदार हिरामण खोसकरांनी केला आहे. तसेच जर माझ्यावर कारवाई करत मला आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिली नाही. तरी मी थांबणार नसून, कार्यकर्ते, समर्थकांशी बोलून मला पुढील भूमिका घ्यावी लागेल”, असा सूचक इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.(Congress MLA)
पक्षश्रेष्ठींकडूनच माझी बदनामी
या विधानपरिषदे निवडणुकीत मी महाविकास आघाडीच्याच उमेदवाराला मत दिले असून, याबाबत मी शपथ घेऊनही सांगितले आहे. हे आमदार फुटले ज्यांची मतं फुटली. त्यांच्यावर कारवाई नाही व मी शपथ घेऊनही माझ्यावर आरोप केले जात आहेत. माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. मला उमेदवारी द्यायची नसल्यास नका देऊ पण मला बदनाम तरी करू नका. पक्षश्रेष्ठींकडूनच माझी बदनामी होत असून, हे चांगले नसल्याचे म्हणत आमदार खोसकर यांनी थेट काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींवरच आरोप केले आहेत.(Congress MLA)
Hiraman Khoskar | इगतपुरीचे आमदार अजित पवार गटात..?; भुजबळांच्या भेटीने चर्चांना उधाण
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम