Skip to content

सिटीलिंक बसचालक-वाहकांचा प्रामाणिकपणा; प्रवाशांच्या हरवलेल्या वस्तू केल्या परत

bus

नाशिक : नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंक बसचालक व वाहकांचा प्रामाणिकपणा पुन्हा समोर आला आहे. यावेळी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सापडलेल्या प्रवाश्यांच्या वस्तु व रोकड सिटीलिंकतर्फे संबंधित प्रवाशांना पुन्हा परत करण्यात आल्या आहेत.

सिटीलिंकतर्फे जाहीर केलेली सविस्तर माहिती अशी, १९ सप्टेंबर रोजी तपोवन आगारातील बसचालक मेघराज जाधव हे निमाणी ते भगूर बसफेरीवर कामगिरी बजावत असताना त्यांना चालकाच्या मागील सीटवर एक कापडी पिशवी असल्याचे निदर्शनात आले. त्यांनी सदर पिशवी तपासताच त्यात रामप्रभू वाणी यांच्या नावाचे बँक पासबुकसह १९,००० रुपयांची रोकड असल्याचे कळाली. मात्र जाधव यांनी आपला प्रामाणिकपणा दाखवत सदर पिशवी सिटीलिंक कार्यालयात जमा केली. कार्यालयाने तात्काळ प्रवासी वाणी यांच्याशी संपर्क साधत त्यांना कार्यालयात बोलावून घेतले व संपूर्ण खातरजमा करून सदर बँक पासबुक व रोकड सदर प्रवासीला परत केली.

तर दुसर्‍या घटनेत सिम्बोईसीस कॉलेज ते निमाणी मार्गावरील बसवाहक मनोहर गायकवाड यांनादेखील चालू बसमध्ये रेडमी कंपनीचा मोबाइल आढळून आला. यावेळी वाहक मनोहर गायकवाड यांनी सदर बाब लगेच निमाणी स्थानकातील वाहतूक नियंत्रक कल्पेश ठाकुर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर तपासणी केली असता सदर मोबाइल सौरभ चौधरी या प्रवाशाचा असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार सौरभ चौधरीशी संपर्क त्याला त्याचा मोबाइल परत करण्यात आला आहे.

दरम्यान, ह्या दोन्ही घटनेत प्रवाशांचे हरवलेले वस्तू परत केल्याबद्दल सदर प्रवाश्यांनी आनंद व्यक्त करत सिटीलिंकचे आभार मानले आहेत. यावेळी प्रवाश्यांनी वस्तू हरवल्यामुळे आम्ही अशा सोडून दिली होती मात्र प्रामाणिकपणा अजूनही शिल्लक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!