छत्रपती शिवाजी महाराज अ‍ॅज ए नेशन बिल्डर; महाराजांवर पदव्युत्तर पदवी घेता येणार

0
10

छत्रपती शिवाजी महाराज | महाराष्ट्रासोबत देशातील नागरिकांसाठी एक अभिमानाची बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांवर आता पदव्युत्तर पदवी घेता येणार आहे. यामुळे छत्रपती शिवरायांची युद्धनीती, धोरणे या अभ्यासता येणार आहे.  आपण शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अभ्यासलेला आहे. छ. शिवाजी महाराजांनी विविध युद्धनितीचा अवलंब करुन स्वराज्याची निर्मिती केली आहे. महाराजांच्या अनेक लढाया,  त्यांचे बालपण आणि जीवन चरित्र्य शालेय अभ्यासक्रमात अभ्यासले जाते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व, राष्ट्रनिर्माते म्हणून जगभरात महाराज अभ्यासले जातात. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांवर पूर्णवेळ अभ्यासक्रमाची अद्यापही निर्मिती झालेली नव्हती. मात्र आता पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज हा विषय घेऊन पदव्युत्तर पदवी घेता येणार आहे.

Navratri Utsav 2023 | “पटेल समाजाशिवाय प्रवेश नाही” मुंबईत झळकले फलक!!

छ. शिवाजी महाराजांच्या राष्ट्र उभारणीची संकल्पना, राज्य म्हणून विचार, प्रशासन, युद्धनिती, जगभरातील योद्धांशी तुलनात्कम अभ्यास, गडकिल्ले क्षेत्रभेटी, नौदलाचे प्रणेते इत्यादी विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी एक वर्षाच्या पदव्यूत्तर पदविका अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आलेली आहे. ‘PG Dilpoma in Chhatrapati Shivaji Maharaj as a Nation Builder’ असे या अभ्यासक्रमाचे नाव असणार आहे. या पदवीत वरिल सर्व विषय अभ्यासले जाणार असल्याची माहिती  संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. विजय खरे यांनी दिलेली आहे.  या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेता येईल.

IRCTC Vaishno Devi Package| ह्या नवरात्रीत फक्त ८ हजारांत करा वैष्णोदेवीचे दर्शन…

यंदाच्या वर्षीपासून या पदवी अभ्यासक्रमाला सुरूवात होणार आहे. कोणत्याही विद्याशाखेच्या पदवी धारकाला या अभ्यासक्रमात प्रवेश घेता येणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आलेली आहे.  PG Dilpoma in Chhatrapati Shivaji Maharaj as a Nation Builder या अभ्यासक्रमासाठी जवळपास 20 मुलांना पहिल्या वर्षी प्रवेश दिला जाईल. यातील काही जागा बाहेरील देशातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील, अशी माहिती विद्यापिठाकडुन देण्यात आलेली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here