Chhatrapati Sambhajinagar | रात्री पतीसोबत भांडण अन् सकाळी पत्नीने घरच पेटवले..

0
25
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar |  प्रत्येक नवरा बायकोच्या नात्यात भांडणं ही होतच असतात. संसार म्हटलं की, भांड्याला भांडं लागतंच. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या नवरा बायकोच्या या भांडणात बायकोने थेट स्वतःचे घरच जाळून टाकले आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी परिसरात वास्तव्यास असलेल्या ४० वर्षीय न्यूरोलॉजिस्ट गोविंद वैजवाडे आणि त्यांची पत्नी डॉ. विनीता वैजवाडे व्यवसायाने डॉक्टर दांपत्याने रविवार रोजी रात्रीच्या सुमारास काही कारणावरुन जोरदार भांडण झाले होते. याच्याच रागातून पत्नीने थेट घर जाळण्याचा प्रताप केला आहे.

या घटनेत आरोपी पत्नीने रागात स्वत:च्या घरालाच आग लावली. दरम्यान, ही आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवले असून, यानंतर मात्र, पतीन एपत्नीव्र थेट पोलिसात गुन्हाच दाखल केला आहे.(Chhatrapati Sambhajinagar)

Khichdi Scam | अन् संजय राऊतांनी आरोपींची नावंच वाचून दाखवली…

Chhatrapati Sambhajinagar | नेमकं प्रकरण काय..?

छत्रपती संभाजीनगर येथील मुकुंदवाडी परिसरात वास्तव्यास असणारे ४० वर्षीय न्यूरोलॉजिस्ट गोविंद वैजवाडे व त्यांची पत्नी डॉ. विनीता वैजवाडे राहतात. या दोघांचे २०१९ मध्ये लग्न झाले होते. मात्र, या त्यांचे रविवारी रात्री काही कारणावरुन जोरदार भांडण झाले. हे भांडण दोघांच्या पारिवारिक डॉक्टर मित्रांनी सोडवले होते. त्यानंतर विनीता यांना त्यांचा राग शांत करण्यासाठी त्यांच्या मित्राच्या रुग्णालयात पाठवले. त्यानंतर सकाळी त्या परत पतीच्या फ्लॅटवर आल्या आणि सोमवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान त्यांनी आपल्या पतीवर राग काढण्यासाठी थेट स्वत:चे घरच पेटवले.

Trimbakeshwar | नाशिकच्या आधारतीर्थ आश्रमात मुलीचा मृत्यू; तपासात शरीरावर आढळले…

…अन्यथा संपूर्ण इमारत जळून खाक झाली असती

डॉ. गोविंद वैजवाडे यांच्या घरातून आगीचे आणि धुराचे लोट दिसत होते. त्यामुळे त्यांच्या शेजारील ११ घरांनाही या आगीचा धोका निर्माण झाला. दरम्यान, शेजारील राहिवाश्यांनी अग्नीशमन दलास फोन केला. मात्र, अग्नीशमन दलाची गाडी पोहोचेपर्यंत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नसून, अग्नीशमन दलाच्या गाड्या वेळेत आल्या नसत्या तर, संपूर्ण इमारत जळून खाक झाली असती. डॉ. विनीता गोविंद वैजवाडे या आयुर्वेदिक डॉक्टर असून, त्या एका महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. या प्रकरणी पती डॉ. गोविंद वैजवाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन डॉ. विनीता यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. (Chhatrapati Sambhajinagar)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here