Chhagan Bhujbal | ‘भुजबळसाहेब काय चुकीचे बोलले.?’; उदयकुमार आहेरांचा राणेंवर पलटवार

0
36
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal | राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाजपच्या ४०० पारच्या घोषणेमुळे एकप्रकारे एनडीएचे नुकसान झाले. एनडीए ४०० पार गेल्याने देशाचे संविधान बदलणार नाही. हे लोकांना समजावून देतानाच नाकीनऊ आले”, असे वक्तव्य केले होते. त्यावरून भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत “भुजबळांना आवरा” अशा शब्दात टिका केली होती. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ता उदयकुमार आहेर यांनी निलेश राणे यांच्यावर पलटवार केला आहे.

भाजपाचे निलेश राणे हे सातत्याने वेगवेगळ्या वादग्रस्त विषयांवर आपली वादग्रस्त मते व्यक्त करून महायुतीचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करित असतात. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब हे काय चुकीचे बोलले.??!! ४०० पारचा नारा दिल्यामुळे दलित व इतर छोट्या छोट्या समाजात खरोखरच संविधान बदलण्याविषयीची भीती राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात निवडणुकांमध्ये व्यक्त होताना दिसली आणि दिसत आहे.

Maharashtra Politics | भुजबळांना आवरा, वयाचा आदर करतो, पण..; भाजपकडून भुजबळांना घरचा आहेर

Chhagan Bhujbal | नाकी नऊ आले, ही वस्तुस्थिती  

त्यामुळे प्रचार करणाऱ्या महायुतीच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना नाकी नऊ आले होते, ही वस्तुस्थिती आहे. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना बहुमत मिळाल्यास ते संविधान बदलणार नाहीत, हे खरे असले तरी विविध समाजातील आणि विशेषतः दलित समाजातील लोकांना पटवून देताना महायुतीच्या कार्यकर्त्यांची व प्रचारकांची दमछाक प्रचार काळात झाली होती.

त्याचा परिणाम थोड्याफार प्रमाणात का होईना निकालावर दिसण्याची भीती सर्वांनाच आहे. सर्वांच्या मनातील भावना जर श्री. छगन भुजबळ यांनी वडीलकीच्या नात्याने व्यक्त केल्या असतील तर त्यात चुकीचे ते काय..? भाजपाचे निलेश राणे हे सातत्याने वादग्रस्त विधान करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. छगन भुजबळ यांना आवरा हे त्यांचे ट्विट देखील त्याचाच एक भाग आहे. त्याकडे लक्ष देण्याची फारशी गरज नाही, असे परखड मत उदयकुमार आहेर (Udaykumar Aher) यांनी व्यक्त केले आहे.

Jitendra Awhad | अजितदादांविषयी बोलायची आव्हाडांची लायकी नाही; उदयकुमार आहेरांचे आव्हाडांना ओपन चॅलेंज


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here