Chhagan Bhujbal | लोकसभा निवडणूकीती विरोधकांकडून संविधानाविषयी गैरसमज पसरवण्यात आला. त्यावेळी वापरण्यात आलेले फेक नरेटिव्ह ठेवून चालून गेले. परंतु आत्ताच्या निवडणुकीत तसे होऊ देणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिकमध्ये प्रचार सभा पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध नेते उपस्थित होते.
Chhagan Bhujbal | पुस्तकातील ‘ते’ दावे भुजबळांनी फेटाळले; नेमकं प्रकरण काय…?
लाडकी बहीण योजनेचा अधिक विस्तार करणार
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधकांचा समाचार घेतला असून “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात व राज्यात सरकार सामान्यांच्या विकासासाठी काम करीत आहे व त्याचा परिणाम देखील दिसत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली राज्यातील महायुतीचे सरकार काम करीत आहे. हे सरकार सर्व घटकांना न्याय देत असून कुठलाही घटक विकासापासून वंचित नाही. लाडकी बहिण योजनेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असून लोकांमध्ये ही योजना लोकप्रिय झाली आहे. राज्यात सरकार आल्यानंतर या योजनेचा अधिक विस्तार केला जाईल.” असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
जनता फेक नरेटिव्हला भुलणार नाही
“महायुती सरकारमुळे नाशकात विकासात्मक कामे करण्यात आली आहेत. याची जाणीव मतदारांना नक्कीच आहे. तेव्हा विरोधी पक्षांचा फेक नरेटिव्ह यावेळी चालणार नसून जनता या निवडणुकीला फेक नरेटिव्हला भुलणार नाही जनता सर्व जाणून आहे.”अशी टीका भुजबळाने यावेळी केली. पुढे बोलत, त्यांनी काँग्रेस आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत भाजप संविधान बदलणार आहे. असा खोटा प्रचार केला. त्याला मतदार भुलले. परंतु आता असे होणार नाही.
Chhagan Bhujabal | ‘जातीत विष पेरण्याचे काम’; प्रचाराचा नारळ फोडत भुजबळांनी घेतला विरोधकांचा समाचार
संविधान बदलण्याची भाषा विरोधकांनी गेल्या निवडणुकीत केली. यावेळी या अपप्रचारानंतरही जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा निवडून दिले आहे. लोकसेभ तिसऱ्यांदा सत्तेत आल्यावर पंतप्रधान मोदींनी संविधानावर डोके ठेवले. त्यांना संविधानापुढे नतमस्तक झालेले सर्वांनी पाहिले. त्यामुळे आता राहुल गांधी यांनी संविधान दाखवून निवडणुकीत कितीही भाषणे केली, तरी जनता त्याला बळी पडणार नाही.” असे म्हटले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम