Chhagan Bhujbal | पुस्तकातील ‘ते’ दावे भुजबळांनी फेटाळले; नेमकं प्रकरण काय…? 

0
41
#image_title

Chhagan Bhujbal | राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्याबद्दल खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. यानंतर आता त्याच्यावरती प्रतिक्रिया देत, आपण अशी कुठलीही मुलाखत दिली नसल्याचे सांगत छगन भुजबळ यांनी सर्व दावे फेटाळून लावले आहेत. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठल्यातरी उद्देशाने हे केले गेले असल्याची शंका उपस्थित करत कारवाईचा इशारा दिला आहे.

Chhagan Bhujabal | ‘जातीत विष पेरण्याचे काम’; प्रचाराचा नारळ फोडत भुजबळांनी घेतला विरोधकांचा समाचार

नेमकं प्रकरण काय?

राजदीप सरदेसाई यांच्या ‘द इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया’ या पुस्तकात करण्यात आलेल्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप झाला असून “ईडीपासून सुटका व्हावी याकरिता आपण भाजपसोबत गेलो.” असं भुजबळ यांनी सांगितल्याचा दावा या पुस्तकातून करण्यात आला आहे. “मी ओबीसी असल्यामुळे माझ्यावर कारवाई करण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितलेचा दावाही यात करण्यात आला असून पुस्तकातील सर्व दावे भुजबळांनी शुक्रवारी फेटाळून लावले. समाज माध्यमांशी बोलताना त्यांनी, “मी अशी कुठलीही मुलाखत दिलेली नसून ईडी पासून सुटका करण्यासाठी तिकडे गेलो. हा आरोप अनेक दिवसांपासून होत आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात उद्धव ठाकरे यांचे सरकार असतानाच मला कोर्टाने क्लीन चीट दिली आहे. त्यामुळे ईडीची भीती होती. असे काही नाही. ज्या 54 लोकांनी सह्या केल्या होत्या. त्या सगळ्यांवर ईडीची केस नव्हती. तिकडे गेल्यानंतर आम्ही मतदार संघाचा विकास करू शकलो. लोकांचा विकास व्हायला हवा त्यामुळे आम्ही सरकारमध्ये सामील झालो. त्याचा विकासासाठी फायदा झाला आहे व होत आहे.” असेही भुजबळांनी यावेळी स्पष्ट केले.

Chagan Bhujabal | “पुतणे काकांचं ऐकत नाहीत, सगळ्या पुतण्यांचे DNA सारखेच”; भुजबळांच्या वक्तव्यानं वेधल लक्ष

पुस्तक वाचून कारवाई करणार

तसेच, हे सर्व आत्ताच का लिहिले गेले हे पाहणे महत्त्वाचे असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यामागे काय हेतू आहे, याची कल्पना नाही. फोकस चेंज करण्याच्या उद्देशाने हे करण्यात आल्याचे दिसत असून हे पुस्तक मी वाचलेले नाही. तेव्हा त्यात काय लिहिले आहे माहित नाही. सात-आठ दिवसानंतर पुस्तक वाचून त्यात जे चुकीचे असेल त्यावरून मी निश्चितपणे कारवाई करणार असल्याचे भुजबळांनी सांगितले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here