Chhagan Bhujbal | नाशिकमधील अपूर्ण प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचे मंत्री भुजबळांचे निर्देश

0
11
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal |  आरोग्य विद्यापीठातील वैद्यकीय महाविद्यालयासह गंगापूर येथे कन्व्हेशन सेंटर, साहसी क्रीडा संकुल व कलाग्राम यासह नाशिकमधील अपूर्ण असलेले प्रकल्प हे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावेत, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत काल नाशिक येथे मेळा बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा पार पडला, यावेळी ते बोलत होते.(Chhagan Bhujbal)

दरम्यान, याप्रसंगी पर्यटन मंत्री गिरीश महाजन, नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे,आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त डॉ.अशोक करंजकर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, विभाग नियंत्रक अरुण सिया, प्रशांत जाधव, बाळासाहेब सानप यांसह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Chhagan Bhujbal)

Chhagan Bhujbal | विणकरांसाठी मंत्री छगन भुजबळ मैदानात; केली ही मागणी

Chhagan Bhujbal | काय म्हणाले मंत्री छगन भुजबळ..?

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकच्या या मेळा बस स्थानकाचा विकास हा विमानतळाच्या धर्तीवर करण्यात आला आहे. ही वास्तू अतिशय सुंदर झाली असून, नाशिकच्या या बस स्थानकाच्या धर्तीवर राज्यातील इतर बस स्थानकांचाही विकास करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुढे ते म्हणाले की, नाशिकच्या विकासासाठी कृषी टर्मिनल मार्केट, किकवी पेयजल प्रकल्प, इगतपुरी हील स्टेशन, द्वारका ते नाशिकरोड चौपदरी उड्डाणपूल यासह अनेक महत्त्वाची कामे लवकरात लवकर करण्यात यावी. तसेच नाशिकच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्याची अशी मागणीही त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्र्यांकडे केली.(Chhagan Bhujbal)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here