Chhagan Bhujbal | गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. येथे राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्यात तिकीटासाठी चढाओढ सुरू होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी स्वतः मंत्री छगन भुजबळांनी अचानक या तिकीटाच्या शर्यतीतून माघार घेतली. दरम्यान, छगन भुजबळांच्या या माघारीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. तसेच यामुळे राष्ट्रवादीत अंतर्गत कलह सुरू असून, नेते अजित पवारांवर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. (Chhagan Bhujbal)
मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत गेल्या तीन आठवड्यांपासून वाट बघूनही आपली उमेदवारी जाहीर न झाल्याने आपण थेट निवडणुकीतून माघार घेत असल्याचं यावेळी त्यांनी जाहीर केलं. तर यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचेच आदेश पाळले जात नसल्याची खंतही बोलून दाखवली.
Chhagan Bhujbal | नाशिकच्या उमेदवारीबाबत भुजबळांचे मोठे वक्तव्य
महायुतीतील तिन्ही पक्ष या जागेवर अडून असल्यामुळे नाशिकच्या जागेचा निर्णय हा होतच नव्हता. त्यामुळे अखेर छगन भुजबळ यांनी वैतागून निवडणुकीतून माघार घेतली. तर, दुसरीकडे ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी राष्ट्रवादीची ताकद कमी पडल्याची चर्चा आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा भाजपला आणि नाशिकची जागा शिंदे गटाला अशी डील झाल्यामुळे आधीच छगन भुजबळ यांनी माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. (Chhagan Bhujbal)
Chhagan Bhujbal | अजित पवारांवर नाराजी
नाशिक लोकसभेच्या वादातून अचानक भुजबळ यांनी माघार घेतली असून, जागावाटपाच्या वादामुळे पक्षातील नेते हे अजित पवारांवर नाराज असल्याचे चित्र स्पष्ट आहे. अजित पवार यांनी सातारा लोकसभेची जागा भाजपला दिली. मात्र त्या बदल्यात आलेली नाशिकची जागा ही वेळीच भूमिका न घेतल्याने गमावली. त्यामुळे अजित पवारांच्या जागा वाटपाबाबतच्या भूमिकेवर पक्षातील एक गट नाराज आहे. (Chhagan Bhujbal)
Chhagan Bhujbal | उमेदवाराचे नाव जाहीर केलेच कसे?; भुजबळ श्रीकांत शिंदेंवर संतापले
नाशिक, सातारा, गडचिरोली व परभणी या महत्त्वाच्या जागा महायुतीच्या मित्रपक्षांच्या दबावामुळे अजित पवार यांनी गामावल्या. तर, ज्या जागा पडतील अशा जागा घेतल्याचेही या गटाचे म्हणणे आहे. सुनील तटकरे, अजित पवार व प्रफुल्ल पटेल हेच जागावाटपाचा निर्णय घेत असल्यामुळेही हे नेते नाराज आहेत. तर, यात नाशिकच्या जागेची भर पडली असे म्हणण्यास हरकत नाही. त्यामुळे नाशिकवरुन सुरु झालेला नाराजीचा सूर पक्षांतर्गत वाद निर्माण करण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Chhagan Bhujbal)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम