Chandwad | सध्या राज्यात सुरू असलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पात नाशिक जिल्ह्यातील चांदवड-देवळा (Chandwad) ह्या मतदारसंघातील विविध प्रलंबित विकास कामांसाठी तब्बल १९२ कोटी १४ लाख रुपयांच्या भरघोस निधीला मंजुरी मिळाल्याची माहिती चांदवड-देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली आहे.
यात प्रमुख जिल्हा मार्ग तसेच राज्यमार्ग आणि इतर जिल्हा मार्ग तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांच्या प्रलंबित कामांसाठी ५१ कोटी ४५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील चांदवड आणि देवळा ह्या तालुक्यांतील सहा तलाठी आणि सहा मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयाच्या बांधकामासाठी तब्बल एक कोटी ८० लाख रुपये मंजूर झाले आहेत.
Onion Issue | कांदा निर्यात बंदी संदर्भात धोरण तात्काळ मागे घ्या; आ. डॉ. राहुल आहेर यांची मागणी
आदिवासी विभागाच्या अंतर्गत मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या प्रलंबित कामांसाठी ११२ कोटी ३० लाख रुपये मंजूर झाले असून, नाबार्डच्या अंतर्गत धोडंबे आणि उशीरवाडी येथील रस्त्यांसाठी ३ कोटी ३८ लाख रुपये देखील मंजूर करण्यात आलेले आहे.
चांदवड तालुक्यातील ट्रॉमा केअर ह्या रुग्णालयासाठी तब्बल ३ कोटी ३७ लाख रुपये तर, देवपूरपाडे (ता. देवळा) येथील आश्रमशाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी १३ कोटी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
Deola | नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश; नुकसानग्रस्त पिकांची आ. राहुल आहेर यांनी केली पाहणी
तसेच, चांदवड तालुक्यातील पारेगाव ह्या गावातील आश्रम शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी ६ कोटी ४४ लाख रुपये असा एकूण १९२ कोटी १४ लाखांचा निधी हा चांदवड-देवळा मतदार संघातील विकास कामांसाठी मंजूर झाला आहे. दरम्यान, हा विकास निधी देखील लवकरच संबंधित विभागांकडे वर्ग होऊन विकास कामे देखील मार्गी लागणार असल्याची माहिती मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिलेली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम