विकी गवळी – प्रतिनिधी : चांदवड | नाशिकच्या चांदवड येथे ५० लाख आठ हजार, पाचशे रुपये किंमतीचा गुटखा चांदवड पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. त्यासोबतच २० लाखांचा ट्रक असा एकूण ७० लाख आठ हजार पाचशे रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल चांदवड पोलिसांनी हस्तगत केला आहे.
Chandwad | चांदवड येथील संतप्त पालकांनी शाळेला ठोकलं कुलूप
हा गुटखा विक्रीसाठी मध्य प्रदेश येथून मुंबईच्या दिशेने जात असल्याची गोपनीय माहिती चांदवड पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, चांदवड पोलिसांच्या सहाय्याने विशेष पथकाने ही कारवाई केली असून, ट्रक चालकाच्या विरोधात चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल केलेला आहे.
यापुर्वीदेखील चांदवड पोलिसांकडुन अशीच धडक कारवाई..
चांदवड शहरातील वरचेगाव येथील तेलीखुंट, टेलिफोन कॉलनी परिसरातील एका घरात गुटखा विक्री करणाऱ्यावर छापा टाकत चांदवड पोलिसांनी गुटखा, सिगारेटसह तब्बल ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ब्रेकिंग | नाशकात वातावरण तापलं! भुजबळांचा ताफा जाताच गावकऱ्यांनी गोमुत्र शिंपडलं
चांदवड शहरातील वरचे गावात संजय सोनू सोमवंशी घरात गुटखा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपअधीक्षक सविता गर्जे यांना मिळालेली होती. या माहितीच्या आधारे श्री. गर्जे यांनी पोलिसांचा फौजफाटा घेत संशयित गुटखा विक्री करणाऱ्या सोमवंशीच्या घरावर छापा टाकला होता. पोलिसांना पाहताच संशयित सोमवंशी पळून गेला होता. पोलिसांनी त्यांच्या घरातून विविध कंपनीचे पानमसाला, सुगंधी तंबाखू, सिगारेटचे ६२९ पॅकेट्स जप्त केले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम