Chandwad | ‘नमो चषक’ स्पर्धांमध्ये चांदवड तालुक्याला दुय्यम स्थान.

0
20
Chandwad
Chandwad

विकी गवळी – प्रतिनिधी : चांदवड |   चांदवडमध्ये ‘नमो चषक स्पर्धा’ याअंतर्गत अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, ५ ते १२ जानेवारी या काळात चांदवड-देवळा मतदासंघात याअंतर्गत विविध खेळाच्या स्पर्धा भरवल्या जाणार आहेत. दरम्यान, यानिमित्ताने दोन्ही तालुक्यांत मतांचे गणित आखले जाणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या नमो चषक स्पर्धेत देवळ्याच्या तुलनेत चांदवड तालुक्यातील खेळाडूंना दुय्यम स्थान दिल्याचे दिसत आहे.

या स्पर्धेअंतर्गत देवळा तालुक्यासाठी चौदा प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात आले असून, चांदवड तालुक्यासाठी मॅरोथॉनसह फक्त आठ प्रकारच्या खेळांचे आयोजन केलेले आहे. दरम्यान, संबंधित लोकप्रतिनिधींना निवडणुकांमध्ये नेहमीच आघाडीवर मतं देणाऱ्या चांदवड तालुक्याला आमदार दुय्यम स्थान तर देत नाही ना? असा प्रश्न आता यामुळे उपस्थित होत आहे.(Chandwad)

Chandwad | चांदवड येथे लाचखोर सरपंच, उपसरपंच एसीबीच्या जाळ्यात

सध्या चांदवड-देवळा मतदार संघाचे प्रतिनिधित्व हे आमदार डॉ. राहुल आहेर करत आहेत. चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात त्यांचे कार्यकर्ते आहेत. तरी देखील चांदवड तालुक्याला ही अशा पद्धतीची दुय्यम वागणूक देणे हे कितपत योग्य आहे. असा प्रश्न आता येथील सामान्य कार्यकर्त्याला पडला आहे.(Chandwad)

Chandwad | असे आहेत खेळांचे आयोजन – 

देवळा तालुका –  १) क्रिकेट, २) कब्बडी, ३) व्हॉलीबॉल, ४) रस्सीखेच, ४) खो-खो, ६) बुद्धिबळ, ७) धावणे, ८) कुस्ती, ९) बॉल बॅडमिंटन, १०) नृत्य, ११) धावणे ४०० मी., १२) रांगोळी, १३) चित्रकला, १४) वत्कृत्व

चांदवड तालुका –  १) क्रिकेट, २) कब्बडी, ३) रांगोळी, ४) कुस्ती, ५) खो खो, ६) चित्रकला, ७) नृत्य, ८) मॅरोथॉन(Chandwad)

Chandwad | राहुल आहेरांचा निधीसाठी सिक्सर; चांदवड-देवळासाठी १९२ कोटी मंजूर


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here