Chandwad-Deola | …अन् म्हणे चांदवड-देवळ्यातून आमदारांनी ताईंना लीड दिले; समर्थकांचा ‘कॉन्फिडन्स’ कौतुकास्पदच…

0
56
Chandwad - Deola
Chandwad-Deola

Chandwad-Deola | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ओवर कॉन्फिडन्समध्ये दिलेला ‘४०० पार’ चा नारा हा भाजपला चांगलाच महागात पडला. तर, नाशिक-दिंडोरीत मोदींचा करिश्माही न चालल्याने उमेदवारांना पराभवाची धूळ चाखावी लागली. एकीकडे जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना दणदणीत पराभव पत्करावा लागल्याने महायुतीचे कार्यकर्ते दुःखात असताना दुसरीकडे चांदवड-देवळ्याच्या पराभवातही आपल्याला कसे श्रेय घेता येईल आणि यातून केदा आहेर यांच्यापेक्षा आ. राहुल आहेर हेच कसे उजवे हे दाखवण्यात आमदारांचे समर्थक मशगुल आहेत.

आमदारांवरील प्रेमापोटी चांदवड-देवळ्यातून ताईंना लीड 

याचे कारणही तसेच, इकडे भारती पवारांचा पराभव जाहीर झाला आणि दुसरीकडे आमदार साहेबांच्या समर्थकांकडून सोशल मिडियावर पोस्ट फिरवण्यात आल्या अन् त्यात काय तर म्हणे “डॉ. भारती पवारांचा पराभव झाला असला, तरी चांदवड देवळा मतदारसंघात कांदा उत्पादक शेतकरी नाराज असुनही भारती पवारांना या विधानसभा मतदारसंघांतून आघाडी मिळाली आणि ही सर्व मते भारती पवारांना नसुन, डॉ. राहुल आहेर यांच्या प्रेमापोटी, कामापोटी, तसेच त्यांचा स्वभाव बघून मतदारांनी भारती पवारांना दिली आहेत. मतदारांमध्ये नाराजी असुनही आमदार डॉ राहुल आहेर यांनी आघाडी कायम ठेवण्यात यश मिळविले आणि त्यामुळे या मतदार संघात डॉ. आहेरांचाच करीष्मा चालतो हे सिद्ध झाले.” आता यात काय किती तथ्य हे चांदवड देवळ्याच्या जनतेला चांगलंच माहितीय…(Chandwad-Deola)

Andolan effects: आ.राहुल आहेर चले जाव…! ; डॉ. कुंभार्डे एकतच राहिले तर केदा आहेरांचे आंदोलकांनी केले स्वागत

आमदारांचे असे कोणते काम की त्या कामामुळे ताईंना लीड..?

डॉ. राहुल आहेर यांनी गेल्या १० वर्षात मतदार संघात किंवा मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी असे काय केले..? की ज्यामुळे मतदार यांच्या शब्दासाठी भारती पवारांना मतं देतील. जे स्वतःच पहिल्यांदा त्यांचे भाऊ केदा आहेर यांच्या भरवश्यावर निवडून आलेत ते भारती पवारांना लीड देणार..? वास्तविक पाहता स्व. डॉ. दौलतराव आहेर यांच्या संघटन काळात केदा आहेर हे त्यांच्यासोबत होते. त्यामुळे त्यांच्यानंतर जनतेने ते स्थान केदा आहेर यांनाच दिले होते.

मात्र, बंधुप्रेमापोटी केदा आहेर यांनी माघार घेत राहुल आहेर यांना संधी दिली. पण वास्तविक पाहता २०१४ च्या निवडणुकीत राहुल आहेर हे कोण आहेत..? हेदेखील लोकांना माहित नव्हते. तर, “केदा आहेर हेच उमेदवार आहेत, असं समजून राहुल आहेरांना मत द्या”, असे आवाहन स्वतः केदा आहेर यांनीच जनतेला केले होते. केदा आहेर यांच्या नावावरच दोन्ही निवडणुकीत यांना मतं मिळाली आणि भावासाठी केदा आहेरांनीही मतदार संघात मोठे परिश्रम घेतले होते. आता आ. राहुल आहेर यांनी मनाचा मोठेपणा दाखवत नानांना साथ द्यावी, असे देखील कार्यकर्त्यांचे मत आहेच. पण असो त्यावर बोलूया भविष्यात…., ही झाली यांची निवडणूक स्ट्रॅटजी… (Chandwad-Deola)

Nashik Loksabha | महायुतीकडून राहुल आहेर आणि करंजकरांच्या नावाची चाचपणी..?

Chandwad-Deola | मतदार संघातील ग्राउंड रिपोर्ट

आता मतदार संघातील ग्राउंड रिपोर्टबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या दोन टर्मपासून राहुल आहेर हेच चांदवड देवळा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. मात्र, या १० वर्षात त्यांनी कधीही शेतकऱ्यांसाठी आक्रमक किंवा ठोस भूमिका घेतली नाही किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते कधी भांडतानाही दिसले नाही. शेजारील येवला, मालेगाव मतदारसंघ बघितले तर, त्या तुलनेत फारकाही भरघोस निधीही राहुल आहेरांना मतदार संघासाठी आणता आला नाही.

निधी तर सोडा, पण त्या मतदार संघांतील लोकप्रतिनिधींचे जितके त्यांच्या मतदारसंघात दौरे होतात. त्याच्या अर्धेही दौरे १० वर्षात राहुल आहेरांचे चांदवड देवळ्यात झालेले नाहीत. तसेच त्यांनी रोजगारासाठी काही प्रयत्न केले नाहीत. रुग्णालयांची स्थितीदेखील फारशी चांगली नाही. मोठी दुर्घटना झाल्यास मालेगाव किंवा नाशिक गाठावे लागते. मल्टीस्पेशालिटी रुग्णालय देखील मतदार संघात उभारता आले नाही हे होणे गरजेचे असताना देखील या बाबी दुर्लक्षित राहिल्या… मग तुम्हीच सांगा आमदारांमुळे लीड कसे ?

समर्थकांचा ‘कॉन्फिडन्स’ कौतुकास्पदच

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या डॉ. दौलतराव आहेर यांच्या राजकीय कारकीर्दीमुळे त्यांच्या सुपुत्रांना राज्यात मान असेल. त्यामुतील आरोग्य विषयक प्रश्न जोमाने सोडवतील, अशी अपेक्षा ठेऊन यांना नेतृत्व करण्याची संधी दिली होती. मात्र, झाले याउलटच…राज्यात भाजपप्राणित सरकार असूनही यांना चांदवड देवळा मतदार संघ दुष्काळग्रस्त असल्याचे जाहीर करता आले नाही. एकूणच स्वतःच्या मतदार संघातच ज्यांच्याबद्दल प्रचंड रोष आहे. त्यांच्याविरोधात वातावरण असून, जनता नाराज असल्याची वस्तुस्थिती असताना “आपल्या आमदारांनी लीड मिळवून दिली. त्यांच्यावरील प्रेमापोटी ताईंना लोकांनी मतदान केले” हा आमदार राहुल आहेर समर्थकांचा (mla rahul aher) ‘कॉन्फिडन्स’ खरंतर कौतुकास्पदच म्हणावा लागेल. (Chandwad-Deola)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here