CA Result 2024 | CA परीक्षेचा निकाल जाहीर; असे आहेत देशातील टॉप 3 CA

0
13
CA Result 2024
CA Result 2024

CA Result 2024 | आज चार्टर्ड अकाउंटंट्स अंतिम व नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेली इंटरमीडिएट या परीक्षांचा (CA Result 2024) निकाल हा आज जाहीर करण्यात आलेला आहे. दरम्यान, या दोन्ही परीक्षार्थींसाठी पुढील अधिकृत  icai.nic.in या अधिकृत वेबसाइटवर हा निकाल उपलब्ध करून देण्यात आलेला होता. दरम्यान, ‘इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया’ द्वारे या CA परीक्षेतील टॉपर्स विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात आलेली असून, टई पुढीलप्रमाणे आहेत.

Education News | आता शालेय अभ्यासक्रमात ‘या’ नव्या विषयाचा समावेश

CA Result 2024 | असे आहेत CA टॉपर्स

बहुप्रतीक्षित, CA फायनल तसेच इंटरमीडिएट या नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. तर, असे आहेत या विद्यार्थ्यांनी पटकावलाय टॉपर होण्याचा मान. या परीक्षेच्या शेवटच्या सत्रात गुजरात राज्यातील अहमदाबादच्या अक्षय रमेश जैन याने ८०० पैकी तब्बल ६१६ म्हणजेच ७७ टक्के गुण मिळवत परीक्षेच्या अंतिम फेरीत देशात अव्वल स्थान मिळवले आहे. तर, यानंतर दुसऱ्या क्रमांकावर चेन्नईचा कल्पेश जैन हा ८०० पैकी ६०३ म्हणजेच ७५.३८ टक्क्यांवर आहे. यानंतर नवी दिल्ली येथील प्रखर वार्ष्णे याने ८०० पैकी ५७४ म्हणजेच ७१.७५ टक्के गुण मिळवले आहे. (CA Result 2024)

Educational news | दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचा पॅटर्नच बदलला

आणि असा झाला अक्षय जैन CA टॉपर 

आज जाहीर झालेल्या निकालात अहमदाबादचा अक्षय रमेश जैन हा टॉपर ठरला आहे. CA फायनल या परीक्षेत जुलै २०२३ मध्ये आणि मे २०२३ मध्ये त्याने ऑल इंडिया रँक १ मिळवली आहे. अक्षय जैनचे वडील हे व्यवसायिक आहेत. दरम्यान, पारंपरिक व्यवसाय न सांभाळता त्याने CA होण्याचे ठरवले आणि त्यानंतरच त्याने चार्टर्ड अकाउंटंट या परीक्षेची तयारी सुरू केली होती. (CA Result 2024)

२०१९ मध्ये त्याने CA च्या इंटरन्स परीक्षेत ऑल इंडिया रँक १ पटकावला आणि पुढील मे २०२३ मध्येही त्याने CA अंतिम टप्प्यातील परीक्षा दिली. आणि याहीवेळी त्याने मे २०२३ च्या CA अंतिम परीक्षेत ऑल इंडिया रँक १ मिळवली. दरम्यान, अक्षयने अंतिम परीक्षेत ८०० पैकी तब्बल ६१६ म्हणजेच ७७ टक्के गुण मिळवत टॉपर होण्याचा मान पटकावला.(CA Result 2024)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here