अपघातातील जखमी तसेच मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना सर्वोतोपरी मदत करणार – पालकमंत्री भुसे, बघा कोण होते बस मध्ये

0
3

नाशिक : जिल्ह्यातील चांदवड जवळील मतेवाडी येथे बसचा भीषण अपघात झाला असून. यासंदर्भात नाशिक जिल्हा पालकमंत्री यांनी तात्काळ प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्याशी संवाद साधून संपूर्ण मदत करण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हा शैल्य चिकित्सक अशोक थोरात तसेच पोलिस निरीक्षक चांदवड यांच्याशी स्वतः पालकमंत्री दादाजी भुसे संपर्कात असून या संपुर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत. जखमींना तसेच मृत व्यक्तींना उपचारासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्र्वासन पालकमंत्री भुसे यांनी दिले असून संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या आहेत.

Deola bajar sameeti : बाजार समितीत व्यापारी सभापती नको ते रोख पेमेंट जाणून घ्या सविस्तर

मिळालेल्या माहितीनुसार दोन व्यक्ती जागीच मृत झाले असून दोन गंभीर जखमी आहेत. नाशिक येथील शासकीय हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. तर 8 प्रवासी गंभीर जखमी असून त्यांना चांदवड येथे उपचार सुरू आहेत.

मृत व्यक्तींचे नाव
1. संगीता लाहिरे
2. संगीता खैरनार

गंभीर जखमी
1. गणेश काटे
2. बाळकृष्ण खैरनार
3. गोपीचंद मातोरकर

बस चालक संतोष भालेराव यांना मालेगाव येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

किरकोळ दुखापत
1. दिनकर काळे
2. ऋषिकेश सद्गिर
3. गोपाळ चौहान

साधारण सहा प्रवासी आपल्या सोयीनुसार हॉस्पिटलला दाखल झाल्याची माहिती आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here