Skip to content

Accident: देवळ्याहून मनमाडकडे जाणाऱ्या बसचा अपघात; बसचा चक्काचूर अनेकजण गंभीर, दोघांचा मृत्यू


accident: नाशिक जिल्ह्यात विंचूर-प्रकाशा महामार्गावर भयंकर अपघात झाला असून, देवळ्याहून चांदवडकडे जाणाऱ्या बसचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या या भीषण अपघातात महिला वाहकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एका प्रवाशी महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती असून अनेक प्रवासी गंभीर असल्याची माहिती आहे.

आज नांदुरी येथून मनमाड आगारला जात असतांना चांदवड जवळील मतेवाडी फाटा जवळ हा भीषण अपघात झाला. अपघातात महिला कंडक्टर सारिका लहरे यांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला प्रवासी संगीता खैरनार यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच बसमधील २० ते २२ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.

रस्त्यात समोरुन येणाऱ्या वाहनाने कट मारल्यानंतर एसटीचा रॉड तुटला, यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व एसटी बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडावर आदळल्याने हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, बसचा एका बाजूने पुर्णत: चक्काचूर झाला आहे. बसचा वेग देखील जास्त असल्याचा अंदाज बस बघितल्यावर येतो.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!