Breaking News | 48 तासात लहान मुलं अचानक गायब; राज्यात नेमकं चाललंय काय?

0
27

Breaking News | नवी मुबंईच नव्हे तर राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. नवी मुंबईमधून अचानक लहान मुलगी बेपत्ता होत असल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. ही मुलं अगदी कोवळ्या वयाची असून ही मुलं गायब होत असल्याने पालकही हादरून गेले आहेत. मुलांचं अपहरण होत असल्याची या पालकांची तक्रार तर आहेच पण अचानक होत असलेल्या या प्रकारामुळे पोलीसही हादरून गेले आहेत.(Breaking News)

नवी मुंबई शहरातून मागील 48 तासात सहा अल्पवयीन मुले बेपत्ता झाली असून मुले अचानक बेपत्ता होत असल्यामुळे पालक चिंतीत झाले आहेत. गायब झालेली ही सहाही मुले 12 ते 15 वयोगटाची आहेत तर बेपत्ता मुलांचे अपहरण झाल्याची या पालकांनी तक्रार केलेली आहे. या पालकांनी पोलीस ठाण्यात तशी तक्रारही दिलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवी मुंबईतील पनवेल, कामोठे, कोपर खैरणे, रबाळे, कळंबोली आदी परिसरातील ही मुलं असून याच परिसरातून ही मुले गायब झालेली आहेत.

भीतीचे वातावरण

ही सर्व मुले 3 आणि 4 डिसेंबर रोजी गायब झालेले आहेत आणि या सहा मुलांपैकी एक मुलगा कौपरखैरणेमधून गायब झाला होता. दुसरा 12 वर्षाचा एक मुलगाही असाच बेपत्ता झाला होता मग नंतर तो ठाणे रेल्वे स्टेशनवर सापडला. गायब झालेल्या मुलांपैकी काही मुलं शाळेत गेल्यावर गायब झाली आणि कुणी मित्राच्या घरी कार्यक्रमाला तर कुणी वाढदिवसाला गेलेले असताना गायब झाले आहेत. तसेच रबाळेतील एक मुलगा तर सार्वजनिक शौचालयात गेला होता आणि तिथून तो गायब झाला आहे. मुलं अशी अचानक गायब झाल्याने पालक चांगलेच हादरलेले आहेत. (Breaking News)

Infotech news | ह्या फोनवर मिळताय इअरबड्स मोफत; आताच करा बुक

अपहरण केलेल्या मुलीचा मृत्यू

तीन महिन्यापूर्वी कल्याणमध्ये एक अल्पवयीन मुलगी गायब झालेली होती. नोव्हेंबरमध्ये त्या मुलीचा मृतदेह आढळून आला आणि या मुलीचा मृत्यू संशयास्पद असल्याचं सांगितलं जात होतं. या मुलीने घरातच जीवन संपवल्याचं आढळून आलेलं होतं तसेच या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

टिटवाळ्यातही अपहरण

टिटवाळ्यातील बनेली गावातूनही 25 ऑगस्ट रोजी तीन मुलांचं अपहरण झाल्याची चर्चा झाली होती. ही तिन्ही मुले खेळण्यासाठी घराच्या बाहेर पडली होती आणि त्यावेळी त्यांचं अपहरण झालं असावं असं त्यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं होतं. याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली होती तसेच या प्रकारामुळे टिटवाळ्यातही भीतीचं वातावरण पसरलेलं होतं.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here