Gold Rate | ग्राहकांसाठी आनंदवार्ता! सोने 1300 तर चांदीही झाली स्वस्त

0
3

Gold Rate | सोने आणि चांदीने गेल्या आठवड्यापासून दरवाढीचे अनेक रेकॉर्ड केले आणि अनेक रेकॉर्ड मोडीतदेखील काढले आहेत. ऐन लग्नसराईत सोने-चांदीतील ही दरवाढ ग्राहकांच्या उत्साहावर पाणी फेरणारी ठरली त्यातच जळगावच्या सुवर्णनगरीत पण सोने-चांदीचे दाम गगनाला भिडले होते मात्र सोन्याच्या दरात मंगळवारी एकाच दिवसात एक हजार 300 रुपयांची घसरण झाली आणि त्यामुळे सोने 63 हजार रुपये प्रति तोळ्यावर आले. चांदीच्या भावात ही दोन हजार रुपयांची घसरण होऊन ती 76 हजार रुपये प्रति तोळ्यावर आलेली आहे. लग्नाचा सिजन असल्याने ग्राहकांना सोने चांदीचे दर कमी झाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. (Gold Rate)

Infotech news | ह्या फोनवर मिळताय इअरबड्स मोफत; आताच करा बुक

मंगळवारी सोन्याच्या भावात घसरण

गेल्या आठवड्यापासून सोने चांदीचे भाव सतत वाढत आहे तसेच सोमवारी सोने 64 हजार 300 रुपये प्रति तोळ्यावर तर चांदी 78 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचलेली होती. (Gold Rate) परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात भाव वाढल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सट्टा बाजारात अचानक सोने-चांदी विक्रीला काढण्यात आले आणि त्यामुळे त्यांचे भाव कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या परिणांमामुळे मंगळवारी सोन्याच्या भावात 1300 रुपयांची तर चांदीत दोन हजार रुपयांची घसरण झाली.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), काल (दि. ०५)

  • 24 कॅरेट सोने 62,287 रुपये
  • 23 कॅरेट 62,038 रुपये
  • 22 कॅरेट सोने 57,055 रुपये
  • 18 कॅरेट 46,715 रुपये,
  • 14 कॅरेट सोने 36,438 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले

तसेच एक किलो चांदीचा भाव 74,383 रुपये झाला.

Big news | मिचॉन्ग चक्रीवादळामुळे ८ जणांचा मृत्यू; तर सर्व सेवा विस्कळीत

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास किंवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा तसेच प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो आणि हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल. (Gold Rate)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here