Breaking News | अंगणवाडी कर्मचारी संघाचा नाशिकच्या जिल्हापरिषदेवर मोर्चा 

0
67

Breaking News | महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा नाशिकच्या जिल्हापरिषदेवर मोर्चा काढण्यात आलेला आहे. यावेळी मिनी अंगणवाडीचे मोठ्या अंगणवाडी केंद्रात रुपांतर करा अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात यावेळी अंगणवाडी सेविका महिला या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. Breaking News

Big News | राज्यात डुप्लीकेट मनोज जरांगे; डुप्लीकेट जरांगेंचा मराठा आंदोलनास पाठिंबा की…

शहरातील विविध मार्गांवरुन हा मोर्चा जिल्हा परिषदेवर पोहचला आहे. यावेळी अंगणवाडी सेविका महीला मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी झाल्याने या मार्गावरची वाहतूक खोळंबली दिसत आहे. या मोर्चात ‘मोदी सरकार हाय हाय’, ‘अदिती तटकरे आणि शिंदे सरकार हाय हाय’ अशा घोषणा देण्यात येत आहे. नाशिकच्या जिल्हापरिषदवर हा मोर्चा सुरु झालेला असून नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर हा मोर्चा मार्गक्रमण करत आहे. महिला आणि बाल विकास विभाग मंत्री आदिती तटकरे यांचा यावेळी निषेध करण्यात आला.

Jalna | आंतरवाली सराटीत आजपासून ओबीसींचे उपोषण

यापुर्वीही अंगणवाडी कर्मचारी संघाचा परिषदेवर मोर्चा

नाशिक जिल्हा परिषद आणि प्रकल्प कार्यालय आयुक्तालयाच्या आदेशाचे पालन करीत नाही. अधिकारी आपल्या अधाकराचा गैरवापर करुन अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत आहेत. या कामाच्या सक्तीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. लाइन लिस्ट‌िंगच्या कामाची सक्ती काढून टाकण्यात यावी, सेविकांचा आणि कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत झालेला खर्च त्वरित देण्यात यावा, आयुक्तालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. अशा मागण्या घेऊन मागे असाच मोर्चा काढण्यात आला होता.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here