Skip to content

Big News | राज्यात डुप्लीकेट मनोज जरांगे; डुप्लीकेट जरांगेंचा मराठा आंदोलनास पाठिंबा की…


Big News | मराठा समाजाच्या आरक्षणसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील गेल्या काही महिन्यांपासून चांगलेच चर्चेत आले असताना त्यांची मोठी क्रेझ राज्यातील मराठा तरुणांमध्ये निर्माण झालेली आहे. त्यांच्या सभांना लाखोंची गर्दी होत असून दिवसा किंवा मध्यरात्री त्यांच्या राज्यात सभा होत आहे. मनोज जरांगे पाटील यांचा राज्यात चौथा दौरा सुरु झालेला आहे.

मनोज जरांगे पाटील यांची मंगळवारी अकोल्यात सभा होते आहे. त्याचवेळी अकोल्यात त्यांचा डुप्लीकेट पहायला मिळाला आहे. अकोल्यातील जुन्या शहरात राहणारे तुळशीराम गुजर हे हुबेहूब मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे दिसत आहेत. यामुळे ते अकोला शहरातून मनोज जरांगे यांच्या सभेपूर्वी ते निघाले तेव्हा त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली होती. (Big News)

Maharashtra | महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या; बेरोजगारी मोठे कारण

कोण आहेत तुळशीराम गुजर?

मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे दिसणारे तुळशीराम गुजर म्हणतात, मला काही दिवसांपूर्वी मित्रांनी तुम्ही मनोज जरांगे पाटील याच्यासारखा दिसत असल्याचे सांगितले होते. मला विश्वास बसला नाही त्यानंतर मग मोबाईलमध्ये त्यांचे फोटो पाहिले आणि मला विश्वास बसला. आपण मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे दिसत असल्याबद्दल आनंद झाला असून सध्या मी जेव्हा रस्त्यावरुन जातो तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटत आहे. अनेक जण आपल्यासोबत फोटो घेत आहे आणि सेल्फी काढत आहेत असं तुळशीराम गुजर म्हणतात.

Gold Silver Rate | सोने-चांदीची विक्रमी घोडदौड; असा आहे आजचा दर

मराठा आंदोलनास दिला पाठिंबा..

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनास आपला पाठिंबा असल्याचे तुळशीराम गुजर यांनी सांगितलेले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी आपली मागणी आहे. आपण मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे दिसत असल्याबद्दल आपणास अभिमान वाटतो आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सारखा मी दिसत असल्यामुळे अनेक जण आपल्यासोबत सेल्फी घेत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!