Maharashtra | महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या; बेरोजगारी मोठे कारण

0
2

Maharashtra | मागील वर्षभरात महाराष्ट्र (Maharashtra)राज्यात सर्वाधिक आत्महत्या (suicide) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. मागील वर्षभरात राज्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या असून, राज्यात एकाच वर्षात २२,७४६ आत्महत्या झाल्याची नोंद झाली आहे. महाराष्ट्राच्या पाठोपाठ तामिळनाडूमध्ये देखील १९,८३४ लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत.

कर्जाच्या विळख्यात अडकल्यामुळे तसेच दिवाळखोरीमुळे आत्महत्या (suicide) करणाऱ्यांच्या संख्येत ही मोठी वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून ही धक्कादायक तसेच लाजिरवाणी आकडेवारी समोर आलेली आहे.

दिवाळखोरीमुळे सर्वाधिक आत्महत्या

महाराष्ट्रात(Maharashtra) दिवाळखोरी आणि कर्जबाजारी झाल्यामुळे १,९४१ आत्महत्या (suicide)  यावर्षी झाल्याचं ह्या अहवालात म्हटलेलं आहे. त्यानंतर कर्नाटकात १,३३५ तसेच आंध्र प्रदेश मध्ये ८१५ लोकांनी दिवाळखोरी आणि कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या केल्या आहेत. राज्यात बेरोजगारीमुळे ६४२ तर, गरिबीमुळे ४०२ तसेच व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील समस्यांमुळे ६४० नागरीकांनी आतापर्यंत आपलं आयुष्य संपवलेलं आहे.

Gold Silver Rate | सोने-चांदीची विक्रमी घोडदौड; असा आहे आजचा दर

कौटुंबिक कारणांमुळे सर्वाधिक आत्महत्या 

राज्यात कौटुंबिक समस्यांमुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या ही सर्वाधिक असल्याची बाबदेखील ह्या अहवालातून उघडकीस आली आहे. मागील वर्षभरात कौटुंबिक समस्यांमुळे जवळपास ६,९६१ लोकांनी आत्महत्या केल्याचं देखील हा अहवाल सांगतो. महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्य प्रदेश, कर्नाटक तसेच पश्चिम बंगाल ह्या पाच राज्यांत मिळून देशातील एकूण आत्महत्यांपैकी ४९.३ टक्के आत्महत्या ह्या वर्षी झाल्याचं धक्कादायक वास्तवदेखील समोर आलेलं आहे.

दर तासाला १९ आत्महत्या 

२०२१ मध्ये १,६४,०३३ आत्महत्यांची नोंद होती तर, २०२२ मध्ये १,७०,९२४ आत्महत्या झाल्या होत्या. दरम्यान, यापैकी सर्वात जास्त आत्महत्या ह्या महाराष्ट्र राज्यात १३.३ टक्के, तामिळनाडूमध्ये ११.६ टक्के आणि मध्य प्रदेश मध्ये ९ टक्के, कर्नाटक मध्ये ८ टक्के तर, पश्चिम बंगालमध्ये ७.४ टक्के नोंदी झाल्या आहेत. ह्या आकडेवारीच्या दृष्टिकोनातून गणना केली तर २०२२ मध्ये आपल्या देशात दर १ तासाला १९ लोक आत्महत्या करत आहेत. शेती क्षेत्रात तर, दर तासाला एकपेक्षा जास्त शेतकरी व मजूर आत्महत्या करत असल्याची माहितीही उघड झाली आहे.(Maharashtra)

गंभीर आजारही कारण

देशभरातील १८.४ टक्के लोकांच्या आत्महत्येमागे गंभीर आजार हेदेखील कारण होते. १२ राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये रोगामुळे होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण हे राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. अंदमान व निकोबार बेटे, पंजाब, तामिळनाडू, सिक्कीम व गोवा ह्या राज्यांमध्ये आजारांमुळेदेखील आत्महत्या करण्याचे प्रमाण हे सर्वाधिक आहे.

Malegaon | मालेगावचे माजी आमदार शेख रशीद यांचे निधन


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here