BJP | भाजपचे नेते आता प्रत्येक खेडेगावात मुक्कामी राहणार

0
56
BJP
BJP

BJP |  लोकसभा निवडणुकांच्या संभाव्य तारखा जाहीर झाल्या असून, आता आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सध्या सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही गटांमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाचे सूत्र ठरत आहे. दरम्यान, महायुतीचे सूत्र ठरले असून, माविआची गाडी मात्र अडखळताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपने एक आगळीवेगळी रणनीती आखली आहे.

भाजप येत्या १० फेब्रुवारीपासून ‘गाव चलो’ हे अभियान सुरू करणार आहे. याचे मुख्य उद्दिष्ट हे मोदी सरकारने  राबवलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचविणे हा असून, याद्वारे ‘मोदी गॅरंटी’चा प्रचार केला जाणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. राज्यात भाजपला ५१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही यावेळी बावनकुळे यांनी सांगितले आहे. तर, या अभियानाचे अंतर्गत साडे तीन लाख घरांपर्यंत पोहचण्याचे लक्ष्य असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले आहे.(BJP)

Chhagan Bhujbal | भुजबळांना लाथ घालून मंत्रीमंडळातून काढा..?

महात्मा गांधींच्या ‘खेड्याकडे चला’ या नाऱ्यानुसार आता भाजपातर्फे पक्षाच्या प्रचारासाठी येत्या १० फेब्रुवारीपासून ‘गाव चलो’ हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियाना अंतर्गत २४ तास एकाच गावात मुक्कामी राहून प्रत्येक बूथ लेव्हलला पक्षाचा प्रचार केला जाणार आहे. या अभियानात पक्षाचे केंद्र ते राज्य राज्यपातळीवरील नेते सहभागी असणार आहेत. आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या ‘गाव चलो’ अभियानाची घोषणा केली असून, या अभियाना तब्बल ५० हजार प्रवासी कार्यकर्त्यांची यादी तयार करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

या अभियानाद्वारे ‘मोदी की गॅरंटी’चा नारा गावागावात पोहचविण्यात येणार असून, यात बूथ प्रमुखांचीही बैठक, मतदारांसोबत चर्चा करणे, कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणे, नमो ऍपचा प्रचार करणे, हॅन्ड बिल वाटणे, संघाच्या वरिष्ठ मंडळींसोबत चर्चा करणे, युवा वर्गासाठी ‘नमो चषक’चे आयोजन करणे, स्थानिक सामाजिक संस्थांसोबत चर्चा करणे, भिंती रंगवणे अशा प्रकारचे  एकूण १८ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. (BJP)

Nashik Crime | नाशिकच्या एक रिसॉर्टमध्ये दाजीनेच मेहुणीला…

उद्धव ठाकरेंच्या हाती भोपळा 

उद्धव ठाकरेंना मतदान करण्याचा अर्थ म्हणजे कॉंग्रेसला मतदान करणे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या हाती भोपळा लागणार असल्याची बोचरी टीका यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.  “जी जनता आता ठाकरेंच्या सोबत आहे. त्यांना कालांतराने समजेलच की ठाकरेंना मतदान करणे म्हणजे रामचंद्रांच्या मंदिराचे विरोधी असलेल्या काँग्रेसला मतदान करणे असे यावेळी बावनकुळे म्हणाले.(BJP)

‘मोदींची गॅरंटी म्हणजे विकासाची गॅरंटी’ आहे. मोदींजींनी राम मंदिर बांधण्याची गॅरंटी दिली होती. आता फक्त मोदीजीच चालतात. बाकी इथे कुणाचीही गॅरंटी चालत नाही. उद्धव ठाकरेंची गॅरंटी काय आहे ते लोकांना माहीतीय, ते राहुल गांधी आणि उदय निधी स्टॅलिनसाठी काम करतात, असेही यावेळी बावनकुळे म्हटले आहे. ज्याप्रमाणे आता संपूर्ण देश हा राममय झाला आहे, मोदींनी जो जाहीरनामा दिला होता तो पूर्णत्वास नेल्याचेही ते यावेळी म्हणाले.

BJP | कोणते नेते गावात मुक्कामी राहणार..?

भाजपच्या ‘गाव चलो’ या अभियानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आशीष शेलार, रावसाहेब दानवे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा, सुरेश सावे, विजयकुमार गावित, विक्रांत पाटील आदी प्रमुख नेते या अभियानात सहभागी होणार असून हे या गावांमध्ये मुक्कामीही राहणार आहेत.(BJP)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here