Chhagan Bhujbal | भुजबळांना लाथ घालून मंत्रीमंडळातून काढा..?

0
54
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal |  सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी होत असून, अगदी खालच्या पातळीवर हे राजकारण सुरू आहे. आधी केवळ विरोधक आणि सत्ताधारी जे एकमेकांवर टिका करत होते. मात्र, यातच भर म्हणून की काय आता सत्ताधारी पक्षांतील नेते मंडळीच एकमेकांवर खालच्या दर्जाची टिका करत आहेत. आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी थेट “छगन भुजबळ यांना कमरेत लाथ मारून राज्याच्या मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांकडे केले आहे.(Chhagan Bhujbal)

दरम्यान, आता त्यांच्या या खोचक वक्तव्याचा भुजबळांनी नाशिकमधून चांगलाच समाचार घेतला असून, “गायकवाडांची ही भाषा योग्य नाही आणि मला त्यांना एकंच सांगायचं आहे की, ज्या शिवसेनेच्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी ‘सिनियर प्रोफेसर’ होतो आणि राहिला प्रश्न त्यांनी वापरलेल्या भाषेचा तर त्यासाठी त्यांचे नेते एकनाथ शिंदे आहेत ते बघतील. मला कमरेत लाथ घालून मला बाहेर काढण्याची भाषा त्यांनी वापरली. आता मला मंत्रीमंडळात घ्यायचं की बाहेर काढायचं, हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे आणि ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल”,या शब्दांत भुजबळ यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले.

Nashik Crime | नाशिकच्या एक रिसॉर्टमध्ये दाजीनेच मेहुणीला…

भुजबळ पदावर राहायच्या लायकच नाही

मराठा आरक्षणावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे भुजबळांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी त्यांनी भुजबळांवरही निशाणा साधला होता. ते म्हणाले की,”मंत्री छगन भुजबळ हे स्वतः सरकारमध्ये असून ते थेट मुख्यमंत्र्यांना विरोध करत मराठा आरक्षणा विरोधात जर भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की, त्यांनी या भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून आणि मंत्रिमंडळातून बाहेर काढा. एका मंत्र्याची अशी भूमिका ही कोणत्याही समाजाच्या विरोधात असू नये आणि असल्यास तो मंत्री पदावर राहण्या लायक नाही. आता त्यांना लवकरात लवकर घरचा रस्ता दाखवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केले”. दरम्यान, आता त्यांच्या या विधानामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.(Chhagan Bhujbal)

Political News | गुन्हे धुण्यासाठी काँग्रेसचा आणखी एक नेता सत्ताधारी पक्षात..?

Chhagan Bhujbal | मला कुठल्याही पदाची हौस नाही 

आ. संजय गायकवाडच नाही तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही भुजबळांच्या विरोधात एक राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारे ट्वीट केले आहे. यात त्या म्हणत आहेत की भुजबळ हे भाजपच्या वाटेवर आहे. यावरही भुजबळांनी आज स्पष्टीकरण दिले असून, “मला अजून भाजपच्या कुठल्याही ऑफरबद्दल कसलीच माहिती नाही. अंजली दमानिया यांना ही माहिती कशी काय मिळाली? याबाबत मला माहीत नाही. तसेच मला कोणत्याही पदाची हौस नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी माझ्या ओबीसी समाजासाठीच काम करत आहे. मला असं प्रपोजल आलेलं असून, मी माझ्या पक्षात मंत्री आहे आणि माझी इथे कुठलीही घुसमट होत नाहीये, असं स्पष्ट छगन भुजबळ यांनी यावेळी दिले. (Chhagan Bhujbal)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here