जनतेला सेवा देण्यासाठी नरेंद्र मोदी प्रयत्नशील ; गावित यांचे देवळा येथे प्रतिपादन

0
10
देवळा येथे नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजिय सेवा पंधरवाडा कार्यक्रमात सफाई कामगारांना कपडे वाटप करतांना आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित , आमदार डॉ राहुल आहेर ,भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर ,जितेंद्र आहेर ,अतुल पवार आदी ( छाया - सोमनाथ जगताप )

देवळा ;पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकांना सेवा कशी देता येईल यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून , केंद्र शासनाच्या विविध योजना तळागाळातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा पंधरवाडा कार्यक्रमात त्यांना शंभर टक्के न्याय मिळून देण्यासाठी आपल्यायाला प्रयत्न करायचे आहेत . असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी आज येथे केले .

देवळा येथे नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजिय सेवा पंधरवाडा कार्यक्रमात सफाई कामगारांना कपडे वाटप करतांना आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित आमदार डॉ राहुल आहेर भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर जितेंद्र आहेर अतुल पवार आदी छाया सोमनाथ जगताप

देवळा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा कार्यक्रमानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . ना डॉ गावित यांच्या प्रमुख उपस्थित रक्तदान शिबीर , कोविड बूस्टर डोस ,सफाई कामगारांना कपडे वाटप , वृद्धांना काठी वाटप आदी कार्यक्रम घेण्यात आले . यावेळी ते बोलत होते . प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ राहूल आहेर ,भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर उपसस्थित होते .

यावेळी ना डॉ गावित म्हणाले कि , नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यात सेवा पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून , यात केंद्र शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत शंभर टक्के पाहचविण्यासाठी लाभार्थ्यांचे ऑन लाईन अर्ज भरून घेणे ,त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या काळात आपल्यायाला काम करायचे आहे . अनेक लाभार्थी अद्याप योजनांपासून वंचित आहेत . त्यांना शोधून त्यांना सेवा कशी देता येईल . यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी झोकून घ्यावे . ना डॉ गावित यांचे देवळा शहरात आगमन होताच त्यांचे पाचकंदील परिसरात ढोल ताशाच्या व फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले . यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला .

उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर ,तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण , शहर अध्यक्ष अतुल पवार यांच्या हस्ते ना डॉ गावित यांचा सत्कार करण्यात आला . प्रास्ताविक पवन अहिरराव यांनी केले . कार्यक्रमास आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष एन डी गावित , नगरसेवक मनोज आहेर , अशोक आहेर ,कैलास पवार , आदींसह रोशन अलिटकर , नानू आहेर , किशोर आहेर , संजय कानडे , बाजार समितीचे उपसभापती शन्कर निकम ,हर्षद भामरे , दिनेश पगार , दिशांत देवरे , दौलत थोरात , हर्षद मोरे , भाऊसाहेब आहेर , विजय आहेर ,माजी सरपंच रघु नवरे , सोपान सोनवणे , उपसरपंच नदीश थोरात ,योगेश वाघमारे ,भारत कोठावदे , तहसीलदार विजय सूर्यवंशी , गटविकास अधिकारी राजेश देशमुख आदींसह नगरसेवक , पदाधिकारी ,कार्यकर्ते , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . आभार तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण यांनी मानले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here