Big Breaking | आयोग-इडीसुद्धा ‘यांचे’च नोकर; ठाकरेंनी सरकारला घेरलं

0
9
Big Breaking
Big Breaking

Big Breaking | कालपासूनच राज्यभरात चर्चा असलेली उद्धव ठाकरे यांची आज ‘महापत्रकार परिषद’ आज दुपारी ४ वाजता सुरू असून या परिषदेत दिल्लीतील काही मोठे कायदेतज्ञ, वकील देखील उपस्थित आहेत. दरम्यान, या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालावर भाष्य करत असून तसेच या परिषदेत आता काही गौप्यस्फोट देखील होत आहेत. ‘जनता न्यायालय’ असे या महापत्रकार परिषदेला नाव देण्यात आलेले असून, “सत्य ऐका आणि विचार करा” असे ब्रीदवाक्य आहे.

Uddhav Thackrey | लवादाला मोतीबिंदू झाला म्हणून पुरावे दिसले नाही; पत्रकार परिषदेत राऊत गरजले

उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की, लबाडाने जो निकाल दिला त्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आहोत. सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळेल अशी आशा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार कोणाचं असलं तरीही सत्ता मात्र जनतेची असायला हवी. मी आव्हान देतो की नार्वेकर आणि मिधेंनी विना सुरक्षा बाहेर यावं आणि जनतेसमोर सांगावं शिवसेना कोणाची आहे? दिलेला निर्णय हा लबाडानं नाही तर ‘लवादा’नं निर्णय दिला आहे.

तसेच तुम्ही कसले शिवसेनेचे अध्यक्ष …लायकी आहे तुमची? असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना टोला लगावला आहे. तसेच निवडणूक आयोगावर केस करायला हवी. आपण केलेल्या स्टॅम्प पेपरची गादी करून त्यावर झोपले आहेत का? असा सवाल त्यांनी निवडणुक आयोगाला केला. आयोग आणि इडी सुद्धा त्यांचेच नोकर असून मी मुद्दाम ही पत्रकार परिषद घेतली असं उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

Uddhav Thackrey | …अन् ठाकरेंच्या परिषदेत लावला ‘तो’ व्हिडिओ

Big Breaking | हो हा माझ्या वडिलांचा पक्ष

२०१३ साली कोण कोण होते ते तुम्ही आता पाहिलं आहे. यात राम-गंगाराम ही होते. मला सत्तेचा मोह नसून मला ही शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे. आताच सरकारचं असंविधानिक आहे. आता मी कोणालाही घाबरत नाही. ही लढाई लोकशाही जिवंत ठेवण्याची असून सर्वोच्च नायालयाने घातलेल्या निकषांवर निर्णय येईल अशी आम्हाला आशा होती. पण निर्णय तर लवादाच्या हातात देण्यात आला. समजा आमची घटना चुकीची होती तर २०१४ मध्ये कशाला मला बोलवलं होतं किंवा २०१४ मध्ये माझा पाठिंबा का लागला? तसेच हो हा माझ्या वडिलांचा पक्ष आहे. फडणवीसांनी मुख्यमंत्री पद उबवलं असा टोला यावेळी ठाकरेंनी फडणवीसांना लगावला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here